सिंधुदुर्ग, 5 ऑक्टोबर (हिं.स.) : रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा लोकसभा मतदारसंघ भाजपचाच आहे व हा मतदार संघ भाजपच लढविणार आहे. पक्ष देईल तोच उमेदवार निवडून आणला जाईल अशी माहिती केंद्रीय मंत्री व भाजप नेते नारायण राणे यांनी दिली. ते आज ओरोस येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघावर शिवसेना-शिंदे गट दावा करत असून किरण सामंत लोकसभेची उमेदवारी मागत आहेत, याबाबत पत्रकारानी लक्ष वेधले असता नारायण राणे म्हणाले, या मतदारसंघात भाजपच आपला उमेदवार देणार आहे. पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे तो निवडून आणू व भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
आपण लोकसभेला उभे राहणार का या प्रश्नावर उत्तर देताना नारायण राणे म्हणाले, हा माझा प्रश्न नाही. उमेदवारी कोणाला द्यायची हे पक्ष ठरवेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
हिंदुस्थान समाचार
