नाशिक, २० फेब्रुवारी: – केंद्र सरकारच्या ग्राहक सचिवांनी कांद्याची निर्यात बंदी उठवली नाही म्हटल्यानंतर कांद्याचे माहेरघर असलेल्या नाशिक मध्ये तब्बल सहाशे रुपयांनी कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेल्या बैठकीनंतर कांद्यावरील निर्यात बंदी उठवली अशी मोठी अफवा सुरू होती त्याचाच काही वृत्त संस्थांनी या बाबीला दुजोरा दिला. त्यानंतर सुट्टीनंतर बाजार सुरू झाला. त्यावेळी सोमवारी कांद्याचे भाव हे सहाशे रुपये निवडले होते. परंतु ज्यावेळी मंगळवारी सकाळी ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव यांनी कांद्यावरील निर्यात बंदी ही 31 मार्चपर्यंत कायम असल्याची माहिती दिल्यानंतर कांद्याचे माहेरघर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समितीमध्ये यावेळी बाजार समिती बंद झाल्या. त्यावेळी मंगळवारी तेराशे ते चौदाशे रुपये प्रतिक्विंटल लाल कांद्याला भाव मिळाला आहे म्हणजेच जेवढा भाव वाढला होता तेवढा भाव कमी झाला असून आता शेतकऱ्यांसमोरील प्रश्न हा कायम आहे.
