पुणे, 01 फेब्रुवारी (हिं.स.)।
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात सादर करत आहेत. त्यांनी महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि पुण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. अर्थमंत्री सितारामन यांनी मुंबई पुणे हायस्पीड ट्रेन कॉरिडॉरची घोषणा केली आहे. देशात असे ७ कॉरिडार तयार करण्यात येणार आहेत.
यापूर्वी महाराष्ट्रातील पहिला सेमी हायस्पीड ट्रेन कॉरिडॉर देखील पुण्याला मिळाला आहे. यामुळे पुणे नाशिक दरम्यानचा जळपास तब्बल साडे पाच तासांचा प्रवास 120 मिनिटांत म्हणजेच फक्त दोन तासात पूर्ण होणार आहे. आता दुसरा हायस्पीड कॅरिडॉर देखील मिळवण्याचा बहुमान पुण्याला मिळाला आहे.
आता अर्थमंत्री सितारामन यांनी मुंबई- पुणे हायस्पीड ट्रेन कॉरिडॉरची घोषणा केल्याने पुण्याची वाढ आणखी गतिमान होणार असून दोन शहरांतील प्रवासाचे वेळ आणि अंतर आणखी कमी होणार आहे. याचा फायदा पुणे आणि मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना होणार
पर्यावरणपूरक प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी, सात हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर विकसित केले जाणार आहेत. यात प्रामुख्याने मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद, हैदराबाद-बेंगळुरू, हैदराबाद-चेन्नई, चेन्नई-बेंगळुरू, दिल्ली-वाराणसी आणि वाराणसी-सिलीगुडी. २०२६-२७ मध्ये सार्वजनिक भांडवली खर्च ₹१२.२ लाख कोटींपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु
