बीड, 10 ऑक्टोबर, (हिं.स.)। पूरहानी व अतिवृष्टीमुळे झालेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीबाबत विविध विभागांची आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीस जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग, जलसंधारण (ल.पा. जि.प. बीड), माजलगाव पाटबंधारे विभाग, माजलगाव कालवा विभाग क्र.१० परभणी, सिव्हिल सर्जन तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद बांधकाम विभाग माजलगाव मतदारसंघातील मंजूर कामांचा तपशीलवार आढावा घेऊन, निधी उपलब्ध असलेल्या कामांना गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पूरहानी व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मालमत्तेचे प्रस्ताव तातडीने तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश दिले.
नवीन ग्रामीण मार्ग दर्जाबाबत असलेल्या रस्त्यांचा आढावा घेऊन, पुराच्या काळात संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये मोठ्या पुलांची आवश्यकता लक्षात घेऊन पूल प्रस्तावित करण्याच्या सूचना केल्या.
निधी मंजूर झाल्यास जास्तीत जास्त काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट विभागाने ठेवावे, असेही निर्देश देण्यात आले.
जलसंधारण / लघु पाटबंधारे जि.प. बीड, माजलगाव पाटबंधारे विभाग, जा. प्र. विभाग क्र.३ बीड.पूरहानी व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेऊन, तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.
पुढील रब्बी व उन्हाळी हंगामाचे नियोजन काटेकोरपणे राबवून शेतकऱ्यांना वेळेवर पाणीपुरवठा होईल याची विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश दिले.
ज्या ठिकाणी चाऱ्यांमुळे शेतीसाठी पाणी पोहोचण्यात अडथळा निर्माण होतो, त्या ठिकाणी आवश्यक दुरुस्तीचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
माजलगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम भरीव निधीतून सुरू असून, हे काम विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.काम पूर्ण झाल्यानंतर नव्या पदनिर्मिती व भरतीबाबत माहिती घेण्यात आली.
ट्रॉमा केअर युनिट माजलगाव, ग्रामीण रुग्णालय तेलगाव तसेच स्त्री रुग्णालय माजलगाव या सर्व इमारतींसाठी भरीव निधी मंजूर असून, बांधकामांना अधिक गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
माजलगाव मतदारसंघातील नव्याने मंजूर करावयाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांबाबत पाठवलेल्या प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला आणि त्याबाबत पुढील कार्यवाहीसाठी सूचना करण्यात आल्या.
—————
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis
