नवी दिल्ली, २५ सप्टेंबर (हिं.स.) – भारतीय जनता पक्षाने बिहार, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक प्रभारी आणि सह-प्रभारींची घोषणा केली आहे.बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक प्रभारींचीही घोषणा केली आहे.
भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांनी धर्मेंद्र प्रधान यांना बिहार निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. केंद्रीय मंत्री सीआर पाटील आणि केशव प्रसाद मौर्य यांची सह-प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना पश्चिम बंगालसाठी पक्षाचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. आणि बिप्लब कुमार देब यांना सह-प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. भाजपने पक्षाचे नेते बैजयंत पांडा यांना तामिळनाडूसाठी निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. मुरलीधर मोहोळ यांना निवडणुकीसाठी सह-प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
