नाशिक, 22 सप्टेंबर (हिं.स.)। अमरावती जेलमध्ये अटकेत असलेल्या आरोपीशी संगनमत करून पूर्व नगरसेवक जगदीश पाटील यांनी हत्येचा कट रस्त्याचे समोर आले असून नाशिक मधील ज्या लॉज मध्ये ही बैठक झाली होती त्या लॉजवर पोलिसांनी सोमवारी छापा टाकून काही महत्त्वपूर्ण पुरावे हस्तगत केले आहेत.
मागील आठवड्यामध्ये पंचवटीतील फुलेनगर परिसरामध्ये असलेल्या राहुल वाडी या ठिकाणी गोळीबार झाल्याची घटना घडली होती या घटनेत पोलिसांनी रविवारी भाजपाचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना अटक केलेली होती. या सर्व प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पाटील व अमरावती कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेले शेखर निकम, अन्य काही व्यक्तींची भेट झाली होती आणि त्या भेटीदरम्यान हे सर्व निश्चित झाले होते निकम हे नाशिक मध्ये न्यायालयीन कामासाठी अमरावती वरून आलेले असताना अमरावती पोलिसांनी नाशिक रोड परिसरामध्ये असलेल्या एका लॉजमध्ये निकमला नेले होते त्या ठिकाणी ही बैठक झाली याचा समोर आलेले आहे. त्यानंतर नाशिक पोलिसांनी या ठिकाणी मंगळवारी छापा मारून पुरावे हस्तगत केले आहेत
यासंदर्भात गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त किरण चव्हाण म्हणाले की, निकम व पाटील यांची भेट झाल्याची सगळी पुरावे समोर आले असून याबाबत अमरावती पोलिसांशी संपर्क साधला जाणार आहे याबाबत ची माहिती देऊन सविस्तर अहवाल मागितला जाईल आणि संबंधित अमरावती पोलिसांवरती देखील कारवाई केली जाणार आहे
—————
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV
