सोलापूर, 8 ऑगस्ट (हिं.स.) : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात मंगळवेढा तालुक्यातील 19 गावांचा समावेश आहे या 19 गावांना 1.27 टीएमसी पाणी मंजूर आहे.पण दुर्दैवाने फक्त. 25 टीएमसी एवढेच पाणी माझ्या मंगळवेढा तालुक्यातील 19 गावातील शेतकऱ्यांना मिळत आहे. बाकी उर्वरित एक टीएमसी पाणी कुठे जाते याचा मी तपास काढला असून ते एक टीएमसी पाणी माझ्या मतदारसंघातील 19 गावांना दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही असे मत आमदार समाधान दादा अवताडे यांनी मांडले.ते आज सलगर बुद्रुक येथे रेनबो इंग्लिश मीडियम स्कूलच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. सलगर बुद्रुक येथे डॉक्टर विजय धायगोंडे व डॉक्टर सुनिता धायगोंडे तसेच गावचे माजी सरपंच शिवशंकर धायगोंडे या धायगोंडे कुटुंबा कडून सलगर बुद्रुक ते सलगर खुर्द रस्त्या लगत रेन्बो इंग्लिश मीडियम स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेची निर्मिती करण्यात आली आहे. या शाळेचे उद्घाटन आमदार अवताडे यांच्या हस्ते ठेवण्यात आले होते. त्यादरम्यान इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या उद्घाटन प्रसंगी आमदार अवताडे बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले की दक्षिण मंगळवेढ्यातील 19 गावांचा म्हैसाळ उपसा सिंचन योजनने मध्ये समावेश आहे.या गावांना 19 टीएमसी पाणी उपलब्ध असताना काही तांत्रिक व राजकीय अडचणी पोटी मंजूर असलेले पाणी सदरच्या गावाला मिळत नाही.हे पाणी कुठे मुरतंय याचा शोध घेऊन या संदर्भामध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री मुख्यमंत्री यांच्याशी मी या विषयावर चर्चा केली आहे. —————
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड
