देशातील रेल्वे गाड्यांप्रमाणे आता विमानातही गर्दी होऊ लागली आहे. असाच प्रकार आज, मंगळवारी इंडिगो एअरलाईन्सच्या मुंबई-वाराणसी फ्लाईटमध्ये अनुभवायला मिळाला. ओव्हर बुकिंगमुळे काही प्रवासी विमानाच्या मागच्या बाजुला उभे होते, ज्यामुळे टेकऑफ केलेले विमान पुन्हा विमानतळावर लँड करावे लागले.
BulletsIn
- इंडिगो एअरलाईन्सच्या मुंबई-वाराणसी फ्लाईटमध्ये ओव्हर बुकिंगमुळे समस्या.
- मंगळवारी सकाळी 8 वाजता मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये हा प्रकार घडला.
- विमानाच्या मागच्या बाजुला काही प्रवासी उभे असल्याचे क्रू मेंबर्सना दिसले.
- क्रू मेंबरने पायलटला माहिती दिल्यानंतर विमान परत टर्मिनलवर आणले गेले.
- विमानात प्रवासी उभे असल्यामुळे उड्डाण थांबवले गेले.
- विमान कंपनीकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.
- विमानातील एका प्रवाशाने सांगितले की, टर्मिनलवर परत आल्यानंतर त्या व्यक्तीला उतरवण्यात आले.
- प्रत्येक प्रवाशाच्या केबिनचे सामान तपासले गेले.
- विमानाचे टेकऑफ सुमारे एक तास उशिराने झाले.
- डीजीसीएने 2016 मध्ये जारी केलेल्या नियमांनुसार, उड्डाणानंतर एक तासाच्या आत दुसरे विमान उपलब्ध करून दिल्यास प्रवाशाला कोणतीही भरपाई द्यावी लागत नाही.
