महाराष्ट्र ब्रीज असोसिएशन आणि ब्रीज फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये २९ ते ३१ मे २०२५ दरम्यान तोलानी चषक राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गंगापूर रोडवरील सोमेश्वर मंदिराजवळील गुप्ता गार्डन येथे ही स्पर्धा पार पडणार असून, ही स्पर्धा विशेषतः ज्युनियर आणि सब-ज्युनियर गटासाठी आयोजित करण्यात आली आहे. तोलानी शिपिंग कंपनी या स्पर्धेच्या मुख्य प्रायोजक आहेत.
BulletsIn
-
ही राष्ट्रीय ब्रीज स्पर्धा २९ ते ३१ मे, २०२५ दरम्यान नाशिकमधील गुप्ता गार्डन येथे आयोजित केली आहे.
-
स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र ब्रीज असोसिएशन आणि ब्रीज फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने करण्यात आले आहे.
-
उद्घाटन समारंभ नाशिक ब्रीज असोसिएशनचे अध्यक्ष विनोद कपूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
-
प्रमुख पाहुणे म्हणून अशोक भावना, डॉ. अविनाश देशमुख, प्रसाद होनप, आनंद सामंत, अनिल पाध्ये, हेमंत पांडे, मोहन उकिडवे आणि अतूल दशपुत्रे उपस्थित राहणार आहेत.
-
स्पर्धेची तांत्रिक बाजू के. एस. स्वामिनाथन सांभाळणार आहेत.
-
या स्पर्धेमध्ये भारतातील १५ राज्यांतील एकूण ९० खेळाडू सहभागी होत आहेत.
-
स्पर्धेत १६, २१, २६ आणि ३१ वर्षांखालील मुलं-मुलींचे चार वेगवेगळे वयोगट समाविष्ट करण्यात आले आहेत.
-
स्पर्धेमध्ये ‘टीम चॅम्पियनशिप’ आणि ‘पेअर्स’ अशा दोन प्रकारांत सामने खेळवले जाणार आहेत.
-
सहभागी खेळाडूंमध्ये २०२१ आणि २०२२ च्या जागतिक स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्यपदक विजेते खेळाडूंचा समावेश आहे.
-
या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर भारताच्या जागतिक ब्रीज संघासाठी निवड होणार असून निवडलेले खेळाडू ११ ते १७ जुलै २०२५ दरम्यान इटलीतील सोल्सोमाज ओरे शहरात भारताचे प्रतिनिधित्व करतील.
