नाशिक, आयफोनचे कंपनीचे डुप्लिकेट ऍक्सेसरीज विक्री करणाऱ्या एम.जी. रोड वरील 4 दुकानांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एम.जी. रोड वरील प्रधान पार्क येथील 4 दुकानांमध्ये आयफोनचे कंपनीचे डुप्लिकेट ऍक्सेसरीज विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी आज दुपारी छापा टाकला.तेव्हा रूपाराम जेठाराम चौधरी (वय 40), बाबूलाल नेथीराम चौधरी (वय 28), दिलीप ढोलाराम बिष्णोई (वय 26), कमलेशकुमार सुजाराम चौधरी (वय 23) यांनी कोणतेही स्वामित्व हक्कांचा कायदेशीर अधिकार नसताना उत्पादनाचा बनवटीकरण व साठेबाजी करून नफा मिळवण्यासाठी 3 लाख 86 हजार 530 रुपयांचा बनावट माल मिळून आला. याप्रकरणी पुढील तपास सरकारवाडा पोलीस करीत आहेत.
