मुंबई, मध्य रेल्वे ९२ अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन सेवा चालवणार आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
तपशील खालीलप्रमाणे
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -बनारस साप्ताहिक विशेष (१० फेऱ्या)
01137 साप्ताहिक विशेष गाडी दि. २१.०४.२०२४ ते दि. १९.०५.२०२४ पर्यंत दर रविवारी १४.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २०.०० वाजता बनारस येथे पोहोचेल. (५ फेऱ्या)
01138 साप्ताहिक विशेष गाडी दि. २२.०४.२०२४ ते दि. २०.०५.२०२४ पर्यंत दर सोमवारी २३.०० वाजता बनारस येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी ०४.१० वाजता पोहोचेल. (५ फेऱ्या)
थांबे: दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपुर, सतना, मानिकपूर, प्रयागराज छिवकी आणि वाराणसी.
संरचना: २ वातानुकूलित- तृतीय, १८ शयनयान आणि ३ लगेज कम गार्ड्स ब्रेक व्हॅन.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-गोरखपुर साप्ताहिक विशेष (१२ फेऱ्या)
01169 साप्ताहिक विशेष गाडी दि.१९.०४.२०२४ ते २४.०५.२०२४ पर्यंत दर शुक्रवारी ००.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०८.२० वाजता गोरखपुर येथे पोहोचेल. (६ फेर्या)
01102 साप्ताहिक विशेष गाडी दि. २०.०४.२०२४ ते २५.०५.२०२४ पर्यंत दर शनिवारी ११.२० वाजता गोरखपुर येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल.
थांबे: दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओराई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा आणि बस्ती.
संरचना: १ वातानुकूलित – द्वितीय, ३ वातानुकूलित- तृतीय, ८ शयनयान, २ गार्डच्या ब्रेक व्हॅनसह ५ सामान्य द्वितीय श्रेणी. (१७ डब्बे)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मऊ साप्ताहिक विशेष (अतिरिक्त ८ फेऱ्या)
01079 साप्ताहिक विशेष आता दि. १७.०४.२०२४, दि. २४.०४.२०2४, दि. ०८.०५.२०२४ आणि दि. १५.०५.२०२४ (अतिरिक्त ४ फेऱ्या) रोजी चालविण्यासाठी वाढविण्यात आले आहे.
01080 साप्ताहिक विशेष आता दि. १९.०४.२०२४, दि. २६.०४.२०२४, दि. १०.०५.२०२४ आणि दि. १७.०५.२०२४ (अतिरिक्त ४ फेऱ्या) रोजी चालविण्यासाठी वाढविण्यात आले आहे.
थांबे, वेळ आणि रचना समान राहतील
लोकमान्य टिळक टर्मिनस-समस्तीपुर अनारक्षित साप्ताहिक विशेष (१४ फेर्या)
01039 अनारक्षित साप्ताहिक विशेष दि. २२.०४.२०२४ ते दि. ०३.०६.२०२४ पर्यंत दर सोमवारी १५.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०३.३० वाजता समस्तीपुर येथे पोहोचेल. (७ फेऱ्या)
01040 अनारक्षित साप्ताहिक विशेष दि. २४.०४.२०२४ ते दि. ०४.०६.२०२४ पर्यंत दर बुधवारी समस्तीपुर येथून ०६.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १६.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. (७ फेऱ्या)
थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपुर, सतना, मानिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय, पाटणा आणि बरौनी.
संरचना: २ लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह २२ सामान्य द्वितीय श्रेणी. (२२ डब्बे)
*लोकमान्य टिळक टर्मिनस- दानापुर साप्ताहिक विशेष (१४ फेऱ्या)
01155 साप्ताहिक विशेष गाडी दि. १५.०४.२०२४ ते दि. २७.०५.२०२४ पर्यंत दर सोमवारी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १०.३० वाजता सुटेल आणि दानापुर येथे दुसऱ्या दिवशी १९.०० वाजता पोहोचेल. (७ फेऱ्या)
01156 साप्ताहिक विशेष गाडी दि. १६.०४.२०२४ ते दि. २८.०५.२०२४ पर्यंत दर मंगळवारी २२.०० वाजता दानापुर येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०४.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. (७ फेऱ्या)
थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपुर, सतना, मानिकपुर, प्रयागराज छिवकी आणि पं. दीनदयाल उपाध्याय.
संरचना: १ प्रथम वातानुकूलित, १ प्रथम वातानुकूलित कम वातानुकूलित- द्वितीय,२ वातानुकूलित- द्वितीय, ६ वातानुकूलित – तृतीय, २ लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह ८ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे. (१८ डब्बे)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-बनारस साप्ताहिक विशेष (१० फेऱ्या)
01141 साप्ताहिक विशेष प्रत्येक सोमवारी दि. १५.०४.२०२४ ते दि. १३.०५.२०२४ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १४.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २०.०० वाजता बनारस येथे पोहोचेल. (५ फेऱ्या)
01142 साप्ताहिक विशेष गाडी १६.०४.२०२४ ते १४.०५.२०२४ पर्यंत दर मंगळवारी २३.०० वाजता बनारस येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी ०४.४५ वाजता पोहोचेल. (५ फेऱ्या)
थांबे: दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपुर, सतना, मानिकपुर, प्रयागराज छिवकी आणि वाराणसी.
संरचना: २ वातानुकूलित- तृतीय, ९ शयनयान आणि ११ सामान्य द्वितीय श्रेणी २ लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह. (२२ डब्बे)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-गोरखपुर साप्ताहिक विशेष (१० फेऱ्या)
01143 साप्ताहिक विशेष गाडी दि. १८.०४.२०२४ ते दि. १६.०६.२०२४ पर्यंत दर गुरुवारी १४.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २३.३० वाजता गोरखपुर येथे पोहोचेल. (५ फेऱ्या)
01144 साप्ताहिक विशेष गाडी दि. २०.०४.२०२४ ते दि. १८.०५.२०२४ पर्यंत दर शनिवारी ०३.३० वाजता गोरखपुर येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १३.३० वाजता पोहोचेल. (५ फेऱ्या)
थांबे: दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओराई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा आणि बस्ती.
संरचना: २ वातानुकूलित – तृतीय, ९ शयनयान आणि ११ सामान्य द्वितीय श्रेणी २ लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह. (२२ डब्बे)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-आसनसोल साप्ताहिक विशेष (१४ फेऱ्या)
01145 साप्ताहिक विशेष गाडी दि. १५.०४.२०२४ ते दि. अनारक्षित २७.०५.२०२४ पर्यंत दर सोमवारी ११.०५वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि आसनसोल येथे तिसऱ्या दिवशी ०२.१५ वाजता पोहोचेल. (७ फेऱ्या)
01146 साप्ताहिक विशेष गाडी दि. १७.०४.२०२४ ते दि. २९.०५.२०२४ पर्यंत दर बुधवारी २१.०० वाजता आसनसोल येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०८.१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. (७ फेऱ्या)
थांबे: दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपुर, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय, सासाराम, देवरिया सदर, गया, कोडरमा, हजारीबाग रोड, एनएससी बोस जे गोमोह, धनबाद आणि कुल्टी.
स॔रचना: १ प्रथम वातानुकूलित, २ वातानुकूलित- द्वितीय, ६ शयनयान- तृतीय इकॉनॉमी, ८ शयनयान, ४ जनरल सेकंड क्लाससह १ लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन. (२२ डब्बे)
आरक्षण: उन्हाळी विशेष गाड्यांसाठी 01137, 01169, 01079, 01155, 01141, 01143 आणि 01145 विशेष शुल्कावर बुकिंग दि. १६.०४.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irct.co संकेतस्थळावर उघडेल.
विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आह
