अहमदनगर, 14 एप्रिल : नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघांत वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय घेतला आहे. नगर जिल्ह्यात आणि शिर्डी मतदार संघामध्ये भारतीय जनता पार्टीने आणि शिवसेनेने महायुतीच्या माध्यमातून विद्यमान खासदारांना उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणामध्ये उतरवले आहे.सध्याला दोन्ही मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा डॉ.प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर दोन्ही उमेदवारांची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण यांनी दिली.
उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संतोष गलांडे,राज्य समन्वयक अरुण जाधव,जिल्हा अध्यक्ष नगर दक्षिण प्रतीक बारसे,महिला आघाडी जिल्हा समन्वयक धनश्रीताई शेंडगे,उत्तर जिल्हाध्यक्ष महिला आघाडी वर्षा बाचकर,जिल्हा अध्यक्ष युवा आघाडी निलेश गायकवाड आदिंसह पदाधिकारी व जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
