मुंबई, 7 एप्रिल : डिस्कव्हरी वरील लोकप्रिय डॉक्यु-सिरीज मनी माफियाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या मालिकेचं सिझन ३ पहिल्यांदाच ७ एप्रिल रोजी डिस्कवर चॅनेलवर प्रसारित होणार आहे.
सिझन ३ मधील प्रथम एपिसोड, पे-अप ऑर एल्स, व्यवसाय, पोलिस आणि माफियामधील वसुलीवर आधारित आहे. दुसरा एपिसोड, ‘गोल्ड ब्लडेड’, सोन्याच्या तस्करीच्या इतिहासावर प्रकाश टाकतो. तिसरा एपिसोड द ठग्स ऑफ ड्रग्स मुंबईमध्ये वाढलेल्या म्याऊं-म्याऊं या ड्रग बद्दल आहे आणि अंतिम एपिसोड, क्लीनिंग डर्टी मनी, हीरा व्यापार, बँका, यूपीआय आणि क्रिप्टोकरेंसीमधून मनी लाँडरिंग आणि भारतीय राजकारणाशी संबंधितांवर घोटाळ्यांवर प्रकाश टाकतो.
ही मालिका डिस्कवरी वर टॉप रेटेड आहे आणि या मालिकेतून क्रिप्टोकरेंसी कॉन्स, केतन पारेख द्वारा केलेलं मार्केट मॅनिपुलेशन आणि अब्दुल करीम तेलगी द्वारे केलेला २००३ स्टैंप पॅम्पर स्कॅम आणि इतर अनेक घोटाळे दाखवण्यात आले आहे. हि मालिका वाइस स्टुडिओने प्रोड्युस केली आहे.
