cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Entertainment > एण्ड टीव्ही कलाकारांनी महाशिवरात्रीदरम्यान शिव मंदिरांमध्ये घेतला आशीर्वाद
Entertainment

एण्ड टीव्ही कलाकारांनी महाशिवरात्रीदरम्यान शिव मंदिरांमध्ये घेतला आशीर्वाद

CliQ INDIA
Last updated: March 6, 2024 2:47 pm
CliQ INDIA
Share
8 Min Read
SHARE

मुंबई,  महाशिवरात्री सण साजरा करण्यासाठी एण्ड टीव्हीवरील मालिकांमधील प्रमुख कलाकार जसे मालिका ”अटल”मधील यंग अटल, कृष्णा देवी वाजपेयी व कृष्णन बिहारी वाजपेयी, मालिका ”भाबीजी घर पर है”मधील विभुती नारायण मिश्रा व अनिता भाबी, मालिका ”हप्पू की उलटन पलटन”मधील दरोगा हप्पू सिंग व त्याची दबंग दुल्हनिया राजेश यांनी भारतातील सर्वात प्रतिष्ठित भगवान शिव मंदिरांना भेट दिली. अटल (व्योम ठक्कर), नेहा जोशी (कृष्णा देवी) आणि आशुतोष कुलकर्णी (कृष्णन बिहारी वाजपेयी) यांनी मुंबईतील प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरामध्ये भगवान शिवचा आशीर्वाद घेतला. आसिफ शेख (विभुती नारायण मिश्रा) आणि विदिशा श्रीवास्तव (अनिता भाबी) यांनी त्यांचे मूळगाव वाराणसीला भेट देऊन जगप्रसिद्ध श्री काशी विश्वनाथ मंदिरामध्ये शिव महोत्सवाचा आनंद घेतला. योगेश त्रिपाठी (दरोगा हप्पू सिंग) आणि गीतांजली मिश्रा (राजेश सिंग) यांनी इंदौरला भेट देऊन उज्जैनमधील सर्वात प्रतिष्ठित भगवान शिव मंदिर – श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये भव्य साजरीकरणाचा आंनद घेतला.

मुंबईतील प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिराला भेट देण्याबाबत एण्ड टीव्हीवरील मालिका ”अटल”मधील नेहा जोशी ऊर्फ कृष्णा देवी वाजपेयी म्हणाल्या, ””महाशिवरात्रीच्या दैवी उत्सवात सहभागी होण्यासाठी मी आशुतोष आणि व्योम यांच्यासह मुंबईच्या प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिराला भेट दिली. मंदिरातील ऊर्जा खूप सुंदर आणि शांत होती, दर्शन घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष पूजेत सामील होण्यासाठी भक्तांची गर्दी झाली होती. संपूर्ण परिसर भक्तिभावाने भरून गेला होता आणि सामूहिक प्रार्थनेने जनसमुदायामध्ये एकतेची भावना निर्माण झाली. दर्शनानंतर पुजारीने पवित्र राख अर्पण केली आणि आमच्या कपाळावर गंध लावले. महाशिवरात्रीला दैवी शिवलिंगाचे दर्शन घेण्याचा अनुभव अनोखा व सर्वोत्तम होता. मंदिराच्या बाहेर जल्लोषाचे वातावरण होते. ”हर हर महादेव’चा गजर करत महाशिवरात्रीचा आनंद घेण्यासह भाविकांनी हसतमुखाने शुभेच्छा दिल्या. मंदिर परिसर दिवे आणि सजावटींनी सजला होता, ज्यामुळे उत्सवाच्या आनंदामध्ये अधिक उत्साहाची भर पडली.”” आशुतोष कुलकर्णी ऊर्फ कृष्णन बिहारी वाजपेयी म्हणाले, ””मी अनेक वर्षांपासून मुंबईत राहत आहे, पण कधीच बाबुलनाथ मंदिरात गेलेलो नाही. हे शहरातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे, आणि या वर्षी अखेर मी माझ्या ऑनस्क्रीन कुटुंबासह महाशिवरात्री उत्सवापूर्वी मंदिराला भेट देऊन भगवान शिवचा आशीर्वाद घेतला. मंदिरात प्रवेश केल्यावर उदबत्तीचा दरवळणारा सुगंध आणि प्रार्थनेच्या लयबद्ध मंत्रांनी आम्ही भारावून गेलो, तसेच सर्वत्र प्रसन्न वातावरण झाले होते. मी आणि माझे कुटुंब भगवान शिवचे कट्टर भक्त आहोत; आम्ही दरवर्षी महाशिवरात्रीला उपवास करतो आणि भगवान शिवचे दर्शन घेतो. बाबुलनाथ मंदिराची भेट प्रसन्नतेचा अनुभव देणारी ठरली आणि उत्सवादरम्यान आध्यात्मिकतेचा अद्वितीय अनुभव मिळाला. यामुळे मला आध्यात्माची सखोल भावना मिळाली आणि जणू की मी पवित्र व विलक्षण गोष्टीचा भाग असल्यासारखे वाटले.”” एण्ड टीव्हीवरील मालिका ”अटल”मध्ये यंग अटलची भूमिका साकारणारा व्योम ठक्कर म्हणाला, ””मी पहिल्यांदाच बाबुलनाथ मंदिराला भेट दिली. प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर तेथील भक्तीमय व आध्यात्मिक वातावरण पाहून भारावून गेलो. मी शिवलिंगाला फळे व दूध अर्पण केले, भगवान शिवचा आशीर्वाद घेतला. सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. ”ओम नम: शिवाय!.””

वाराणसीच्या शिव काशी विश्वनाथ मंदिराला भेट देण्याबाबत एण्ड टीव्हीवरील मालिका ”भाबीजी घर पर है”मधील आसिफ शेख ऊर्फ विभुती नारायण मिश्रा म्हणाले, ””काशी विश्वनाथ मंदिराला भेट देण्याची माझी दीर्घकाळापासून इच्छा होती आणि अखेर ही इच्छा पूर्ण झाली आहे, ज्यासाठी मी आभार व्यक्त करतो. तसेच मालिका ”भाबीजी घर पर है”ला नऊ वर्ष पूर्ण झाली आणि भगवान शिवचा आशीर्वाद घेत हा टप्पा साजरा करण्यासारखा दुसरा उत्तम मार्ग नाही. म्हणून या भेटीसाठी दोन लक्षवेधक कारणे ठरली आमच्या मालिकेच्या या टप्प्याला साजरे करणे आणि भगवान शिवचा आशीर्वाद घेणे. आमच्या भेटीदरम्यान भगवान शिवाचा आशीर्वाद घेण्याचा अनुभव अत्यंत संस्मरणीय ठरला. मी मंदिराचा बाह्य परिसर आणि सोनेरी छत पाहून भारावून गेलो. मंदिर परिसरामध्ये प्रवेश केल्यानंतर माझ्यामध्ये आध्यात्मिकतेची भावना जागृत झाली. भगवान शिवचे ज्योतिर्लिंग पाहण्याचा अनुभव उत्साहवर्धक व संस्मरणीय होता. मंदिरामध्ये जाऊन मी माझ्या इच्छा व्यक्त करणार होतो, पण शिवलिंग पाहून भारावून गेलो. माझी या पवित्र वातावरणामध्ये सामावून जाण्यासाठी अधिक वेळ मिळण्याची इच्छा होती. दर्शन घेतल्यानंतर मी सर्वात स्वादिष्ट पेढा प्रसादाचा आस्वाद घेतला आणि माझ्या कुटुंबासाठी काही ड्रायफ्रूट लाडू घेतले. तसेच, मी माझे घर व विविध ठिकाणांना भेट देत गोड आठवणींना उजाळा दिला. ही महाशिवरात्री माझ्यासाठी खऱ्या अर्थाने उत्साहपूर्ण उत्सव ठरली.”” एण्ड टीव्हीवरील मालिका ”भाबीजी घर पर है”मधील विदिशा श्रीवास्तव ऊर्फ अनिता भाबी म्हणाल्या, ””या वर्षी मला पुन्हा माझ्या गावी श्री काशी विश्वनाथ मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी परतण्याचे भाग्य लाभले. मी निस्सीम शिवभक्त आहे आणि या वर्षीची भेट अनेक कारणांमुळे विशेष होती. मला माझी मुलगी ”आद्या’च्या जन्मासह आशीर्वाद दिल्याबद्दल मी भगवान शिवचे आभार मानले. आमची मालिका ”भाबीजी घर पर हैं”च्या नऊ वर्षांच्या यशस्वी प्रवासाबद्दल आणि गेल्या दोन वर्षांपासून मी साकारत असलेली भूमिका अनिता भाबीसाठी कृतज्ञता व्यक्त केली. मी भगवान शिवकडे आमच्यावर त्यांचा कृपाशिर्वाद कायम ठेवण्याची प्रार्थना केली, ज्यामुळे आम्हाला प्रत्येक एपिसोडसह आमच्या प्रेक्षकांना मनोरंजन आणि आनंद देता येईल. यावेळी महाशिवरात्रीचा सोहळा पाहून मी मंत्रमुग्ध झाले. मंदिर सुंदर सजावटीने सजले होते आणि असंख्य भक्त भगवान शिवचा आशीर्वाद घेण्यासाठी जमले होते. प्रसन्न वातावरण, शिव-पार्वतीचे चित्रण करणाऱ्या भक्तांचे आनंदी नृत्य आणि ”हर हर महादेव”चा उत्साहपूर्ण जप यामधून आध्यात्मिक अनुभव मिळाला. वेळ पडल्यास दरवर्षी ही परंपरा चालू ठेवण्याची मी आशा करते.””

उज्जैनमधील श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंगला भेट देण्याबाबत एण्ड टीव्हीवरील मालिका ”हप्पू की उलटन पलटन”मधील योगेश त्रिपाठी ऊर्फ दरोगा हप्पू सिंग म्हणाले, ””या पवित्र मंदिरात भगवान शिवचा आशीर्वाद घेतल्याने शांतता आणि समाधान मिळाले. महाशिवरात्रीदरम्यान शहरात वेगळेच आनंदमय व उत्साहपूर्ण वातावारण पसरलेले असते. या वर्षी भारतातील सर्वात प्रतिष्ठित मंदिरांपैकी एका मंदिरात मला हा अनुभव पुन्हा घेण्याचे आणि भगवान शिवचा आशीर्वाद घेण्याचे भाग्य लाभले. ज्योतिर्लिंगाचा आशीर्वाद घेताना मला पूज्य व आध्यात्मिक समाधानाचा अनुभव मिळाला. या अनुभवासह माझे परंपरा, संस्कृती आणि भगवान शिव यांच्याशी वैयक्तिक संबंध जोडले, ज्यामुळे हा संस्मरणीय अनुभव ठरला. तसेच, माझी मालिका ”हप्पू की उलटन पलटन”ला यशस्वी पाच वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मी भगवान शिवची प्रार्थना केली आणि त्यांचे आभार मानले, तसेच असे अधिकाधिक सेलिब्रेशन करण्याची संधी मिळण्याची आशा व्यक्त केली. इंदोर आणि उज्जैनला भेट माझ्यासाठी नेहमीच खास राहील. मी मोठा फूडी आहे, ज्यामुळे आम्ही इंदौरच्या गजबजलेल्या बाजारपेठांमध्ये भेट दिली आणि तेथील भोजनालयांमध्ये फूडचा मनसोक्त आस्वाद घेतला. मी स्ट्रीट फूडचा आस्वाद घेण्यासह रस्त्यांवरील आमच्या चाहत्यांसोबत गप्पागोष्टी देखील केल्या.”” एण्ड टीव्हीवरील मालिका ”हप्पू की उलटन पलटन”मध्ये राजेशची भूमिका साकारणाऱ्या गीतांजली मिश्रा म्हणाल्या, ””महाशिवरात्री आणि आमच्या मालिकेच्या पाच यशस्वी वर्षांना साजरे करण्यासाठी यासारखा दुसरा उत्तम क्षण नाही. मी महाकाल मंदिरामध्ये प्रवेश करताच आध्यात्मिक व भक्तीमय वातावरणामध्ये भारावून गेले. तेथील पारंपारिक स्रोत व मंत्रांचा जप ऐकून मंत्रमुग्ध झाले. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर भगवान शिवच्या वैश्विकतेचे प्रतीक पवित्र ज्योतिर्लिंग पाहून मी थक्क झाले. प्रार्थनेचे लयबद्ध पठण आणि उदबत्तीचा सुवासिक सुगंध सर्वत्र पसरला होता, ज्यामुळे परमात्म्याशी जुडल्यासारखे वाटले. प्रार्थनेमध्ये सहभागी होणे आणि महाकाल येथील महाशिवरात्री उत्सवाच्या भव्यतेला पाहणे हा आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध करणारा अनुभव ठरला, ज्याने माझ्या तन-मनावर अमिट छाप सोडली. इंदौरमध्ये मी माझ्या आवडत्या स्ट्रीट फूडचा आस्वाद घेतला, माझ्या भाची व पुतणीसाठी भेटवस्तू खरेदी केल्या आणि गजबजलेल्या सराफा बाजारामध्ये फेरफटका मारला.””

पहा मालिका ‘अटल’ रात्री ८ वाजता, ‘हप्पू की उलटन पलटन’ रात्री १० वाजता आणि ‘भाबीजी घर पर है’ रात्री १०.३० वाजता

 

You Might Also Like

‘लॉकडाऊन लग्न’मध्ये प्रीतम कागणे आणि रमेश परदेशी भाऊ-बहिणीच्या भूमिकेत
झी मराठीच्या कलाकारांची मकरसंक्रांतीची तयारी
‘सरफिरा’ हा माझा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट – अक्षय कुमार | BulletsIn
कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी महिला कलाकारांनी जरूर संपर्क करावा – खा. मेधा कुलकर्णी
अंकुश चौधरीच्या ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या चित्रीकरणाचा शुभारंभ | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article माजी ट्विटर एक्झिक्युटिव्हने विच्छेदन वेतन विवादाबद्दल एलोन मस्क विरुद्ध कायदेशीर कारवाई केली
Next Article तामिळनाडू : बोटीतून 108 कोटींची चरस जप्त
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?