अमरावती, 9 फेब्रुवारी : येथील विभागीय क्रिडा संकुलात झालेल्या जिल्हा स्तरीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात धारणी पंचायत समितीला जनरल,माध्यमिक व प्राथमिक चॅम्पियन चषक प्राप्त करण्याचा बहुमान मिळाला.शिक्षण विभाग,जिल्हा परिषद अमरावतीतर्फे या महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.या महोत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांच्या हस्ते झाला.दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमात नांदगाव खंडेश्वर तर निदर्शनेमध्ये अमरावती पंचायत समिती अव्वल ठरली.
जिल्हा स्तरीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या पारितोषिक वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा ह्या होत्या.तर व्यासपिठावर शिक्षणाधिकारी योजना विभागाचे सैय्यद राजीक, उपशिक्षणाधिकारी गजाला नाजली ई खान, प्राचार्य गंगाधर मोहणे, गटशिक्षणाधिकारी धनंजय वानखडे आदी उपस्थित होते.
प्राथमिक विभागात कबड्डी मुले मध्ये गाडेगाव,वरूड शाळा विजयी ठरली तर सातेफळ,चांदुर रेल्वे उपविजयी झाली. कबड्डी मुली मध्ये उकुपाटी,धारणी विजयी झाली व देवरा,अमरावती शाळा उपविजयी झाली. खो खो मुले मध्ये जवळा शहापूर, चांदूर रेल्वे शाळा विजयी तर मांसू धावडी,धा येथील चमू उपविजयी ठरली.खो खो मुली मध्ये मांसू धावडी,धारणी शाळा विजयी व कोल्हा,अचलपुर शाळा उपविजयी झाले. लंगडी मध्ये उकुपाटी,धारणी शाळा विजयी तर रिद्धपुर शाळा उपविजयी ठरली.
तसेच माध्यमिक विभागात कबड्डी मुले- खेळ प्रकारात चिंचोली,मोर्शी शाळा विजयी व मोगर्दा,धारणी उपविजयी ठरली.कबड्डी मुली मध्ये उकुपाटी धारणी शाळा विजयी तर पळसमंडळ, नांदगाव शाळा उपविजयी झाली.खो खो मुले खेळ प्रकारात मांसु धावडी, धारणी शाळा विजयी सलोना,चिखलदरा उपविजयी ठरली.खो खो मुली मध्ये लिंगा,वरूड विजयी तर सलोणा,चिखलदरा येथील चमू उपविजयी झाली.
