मुंबई, 9 फेब्रुवारी,: – भीम भाष्य ह्या यू ट्युब महामालिकेत भाग 35 वा – डॉ. आंबेडकर : एक मानववंशशास्त्रज्ञ ‘शूद्र पूर्वी कोण होते?’ शनिवार,10 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसारित होणार आहे.
पॅाडकास्ट द्वारे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे २५ पैलू आपल्यासमोर ५४ भागांमधून उलगडून दाखविण्यात येत आहेत. ( मराठी, हिन्दी आणि इंग्लिश अशा तीन भाषांमध्ये). ही महामालिका
Dr Narendra Jadhav World या यू ट्युब
चॅनल वर उपलब्ध आहे. ही पुढील लिंक –
https://youtube.com/@DrNarendraJadhavWorld?si=Dqsy-qlKI6AgOPhs
१४ ऑक्टोबर २०२३(धम्मचक्रप्रवर्तन दिन)रोजी सुरु झालेली ही पॉडकास्ट महामालिका प्रत्येक शनिवारी आणि रविवारी (सकाळी ११.३० वाजता) दाखविण्यात येत असून ती १४ एप्रिल २०२४( डॉ आंबेडकर जयंती) पर्यंत नियमितपणे चालेल.
तरी सर्वांनी अवश्य हा भाग पहावा. असे आवाहन करण्यात येत आहे.
