cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Sports > दक्षिण आफ्रिकेचा रॅसी व्हॅन डर डुसेन क्रिकेटमधून निवृत्त
Sports

दक्षिण आफ्रिकेचा रॅसी व्हॅन डर डुसेन क्रिकेटमधून निवृत्त

CliQ INDIA
Last updated: April 3, 2026 6:37 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE
रॅसी व्हॅन डर डुसेन

नवी दिल्ली, 02 एप्रिल, (हिं.स.) – क्रिकेट दक्षिण आफ्रिकेशी झालेल्या करारातून मुक्त झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रॅसी व्हॅन डर डुसेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. एका भावनिक पोस्टमध्ये त्याने आपले कुटुंब, संघ, चाहते आणि सहकाऱ्यांचे आभार मानले. त्याच्या कारकिर्दीचा शेवट प्रभावी विक्रमांसह झाला, पण तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्रिय राहील आणि तरुण क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करणार आहे. रॅसीने सांगितले की तो ‘लायन्स’ संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणे सुरू ठेवेल आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंच्या पुढील पिढीला शिकवून व मार्गदर्शन करून या सुंदर खेळात योगदान देण्यासाठी कटिबद्ध आहे.

निवृत्तीनंतर व्हॅन डर डुसेनने एका निवेदनात म्हटले, मी मोठ्या अभिमानाने आणि कृतज्ञतेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माझ्या निवृत्तीची घोषणा करत आहे. प्रोटियाजची जर्सी परिधान करणे ही एक अशी उपलब्धी आहे, ज्यासाठी धैर्य आणि समर्पण आवश्यक असते, जे तुमची परीक्षा घेते आणि अविश्वसनीय मार्गांनी तुम्हाला त्याचे फळही देते. माझ्या देशासाठी खेळणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे. हा प्रवास अनेक वर्षांच्या त्यागाने तयार झाला आहे, पण दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान प्रत्येक क्षणास पात्र होता. त्याने त्याचे चाहते, सपोर्ट स्टाफ, प्रशिक्षक आणि व्यवस्थापक, तसेच त्याच्या कुटुंबाचे आभार मानले.

व्हॅन डर डुसेनने २०१८ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यानंतर २०१९ मध्ये त्याने एकदिवसीय संघात स्थान मिळवले, जिथे त्याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध ९३ धावांची शानदार खेळी करून आपली छाप पाडली. एकदिवसीय सामन्यांमध्ये, त्याने ७१ सामन्यांमध्ये ५०.१३ च्या सरासरीने २,६५७ धावा केल्या आहेत, ज्यात सहा शतके आणि १७ अर्धशतकांचा समावेश आहे. टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने ५७ सामने खेळून १२८.७६ च्या स्ट्राईक रेटने १,४०६ धावा केल्या.

२०१९ मध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने १८ कसोटी सामनेही खेळले, ज्यात सहा अर्धशतकांच्या मदतीने ९०५ धावा केल्या. त्याची सर्वोच्च कसोटी धावसंख्या ९८ होती, जेव्हा जोहान्सबर्गमधील त्याच्या घरच्या मैदानावर, वाँडरर्सवर इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत मार्क वूडच्या गोलंदाजीवर शॉर्ट कव्हरला झेलबाद झाल्याने त्याचे शतक हुकले.

रॅसी व्हॅन डर डुसेनच्या कारकिर्दीत २०१९ आणि २०२३ चे एकदिवसीय विश्वचषक, आणि २०२१ च्या टी-२० विश्वचषकाचा समावेश आहे. त्याच्या सर्वात उल्लेखनीय क्षणांपैकी एक क्षण २०२३ च्या विश्वचषकादरम्यान आला, जिथे त्याने न्यूझीलंडविरुद्ध १३३ धावा केल्या. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या २०२४ च्या मालिकेसह टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्वही केले.

—————

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे

You Might Also Like

भारतीय महिला संघाची महाकालेश्वर मंदिराला भेट देऊन नवीन वर्षाची सुरुवात
निवडकर्त्यांची चर्चा बुमराह, रोहित आणि नव्या प्रतिभांसोबत भारताची अफगाणिस्तान सीरिजसाठी तयारी
जाँटी रोड्सचा दावा : क्रिकेट प्रशिक्षणाच्या दृष्टीकोनातून युरोपियन खेळाडू भारतीयांपेक्षा चांगले क्षेत्ररक्षक
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच यजमानपद पाकिस्तानकडून काढून घेणार? | BulletsIn
आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत दुर्गा गुंजाळला सुवर्ण पदक

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article भारत कोणत्याही ऊर्जा संकटाला सामोरे जाण्यास पूर्णपणे सक्षम – राजनाथ सिंह
Next Article India Skills 2025–26 Concludes in Greater Noida, Youth Talent Recognized
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?