जळगाव, 19 जानेवारी (हिं.स.) मशिनचे ब्लेड तुटून छातीत घुसल्याने चटई कंपनीत काम करणाऱ्या गिरीश रविंद्र वायकोळे (वय २६, रा. वराडसिम, ता. भुसावळ) यांचा मृत्यू झाला. एमआयडीसी परिसरातील कंपनीत घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील गिरीश वायकोळे हा तरुण एमआयडीसी परिसरातील एका चटई कंपनीत कामाला होता.
मशिनवर काम करतांना अचानक मशिनमधील ब्लेड तुटून ते थेट गिरीश वायकोळे याच्या छातील घुसले. यामुळे तो गंभीर जखमी झाल्याने त्याच्यासोबत काम करणाऱ्यांनी त्याला लागलीच खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकों गफ्फार तडवी हे करीत आहे.
हिंदुस्थान समाचार
