छत्रपती संभाजीनगर, 11 जानेवारी (हिं.स.) : छत्रपती संभाजीनगर क्रीडा मंच आणि छत्रपती संभाजीनगर ऑलिंपिक असोसिएशनच्या वतीने जिल्ह्यात नमो चषक २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. १२ जानेवारी पासून चषकाला सुरूवात होणार होती मात्र वाढता खेळाडूंचा प्रतिसाद आणि पावसामुळे ही स्पर्धा आता १९ जानेवारीपासून सुरू होणार आहे, अशी माहिती आयोजक पंकज भालसाखळे यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.
संपूर्ण देशभर नमो चषकांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत ५१ क्रीडा प्रकारात २५ हजारांपेक्षा अधिक खेळाडू दोन हजार पंच सहभागी होणार आहेत. २४ जानेवारीपर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ही स्पर्धा घेतली जाणार आहे.
हिंदुस्थान समाचार
