रत्नागिरी, 5 जानेवारी, (हिं. स.) : रत्नागिरी शहराजवळील शिरगाव येथील प्रौढाने अज्ञात कारणातून गळफास घेऊन आत्महत्या केली. शैलेश चंद्रकांत निवळकर (वय ४४, रा. शिरगाव-शिवरेवाडी, सुतारवाडी, ता. रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (दि. ४ जानेवारी) सकाळी नऊच्या सुमारास सुतारवाडी येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शैलेशने बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर तो झोपला होता. तो सकाळी लवकर उठला नाही म्हणून पाहिले असता त्याने बेडरूममधील सीलिंग फॅनला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली.
हिंदुस्थान समाचार
