अमरावती, 22 डिसेंबर (हिं.स.) : आझाद हिंद मंडळ बुधवारा अमरावती च्या वतीने स्व हरीभाऊ कलोती यांचे स्मृती प्रितर्थ्य आयोजीत राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत अमरावती च्या आकाश राजपूत ने आझाद श्री चा बहुमान पटकाविला . त्याला 31 हजार रूपये रोख पुरस्कार देण्यात आला . तर अकोला च्या सुरेश जडिये बेस्ट पोझर ठरला ,त्याला 11 हजार रोख व आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
तत्पूर्वी या स्पर्धेचे उदघाटन आमदार प्रविण पोटे यांचे उपस्थितीत करण्यात आले. व्यायमाला चालना देणाऱ्या व शरीर सुदृढ करणाऱ्या स्पर्धा चे आयोजन सतत 32 वर्षा पासून मंडळ करत आहे या बद्दल आ.प्रवीण पोटे यांनी मंडळा चे कौतुक केले. ही स्पर्धा ऐकून 7 गटात खेलविल्या गेली. पहिला गट 60 ते 65 त्यामध्ये शिवाजी वाकोडे जमाल अन्सारी, दत्ता सावरकर, सोहेल खान, सूरज तीवाडे यांनी अनुक्रमे प्रथम व्दितीय तृतीय चतुर्थ व पाचवा क्रमांक पटकाविला. दुसरा गट 60 ते 65 किलो या मध्ये मोहंमद शहजाद, शेख सलीम, शिवकुमार चव्हाण, सौरभ गणवीर व दीपक धानोरकर यांनी अनुक्रमे 1 ते 5 क्रमांक प्राप्त केले. तिसरा गट 65 ते 70 किलो या मध्ये सय्यद मोईद्दिन, प्रीतम साहू, योगेश विश्वकर्मा, इरफान खान व राजा ईवनाते यांनी अनुक्रमे 1 ते 5 क्रमांक पटकाविले. चौथा गट 70 ते 75 किलो या गटामध्ये मोहम्मद आवेश, अब्दुल फारुख, साकिब खान , व ओम बडवाइक यांनी 1ते 5 क्रमांक पटकाविलेपाचवा गट 75 किलो ते 80 किलो या मध्ये योगेश शेंडे, राहुल सरोदे, सर्वेश जडीये, रविंद्र कुंभरे व बॉबी साहू यांनी 1ते 5 क्रमांक पटकाविले. सहावा गट 80 किलो च्या वर या मध्ये आकाश राजपूत, मोहमद तनवीर, सर्वेश साहू, आशिष साहू व तोसिफ खान यांनी 1 ते 5 क्रमांक पटकाविलेसातवा मास्टर्स गट या गटात नरेश पोकळे, श्रीकांत आडे, सय्यद मोह्ममद, संतोष बंधाते व हरीश जडीये यांनी अनुक्रमे 1 ते 5 क्रमांक पटकाविले सर्व गटातील प्रथम, व्दितीय, तृतीय, चतुर्थ व पाचवे स्थान प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना अनुक्रमे 10 हजार , 8 हजार ,6 हजार, 4 हजार आणि 2 हजार रूपये रोख व आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन खेळाडूचा उत्साह वाढविला.
हिंदुस्थान समाचार
