जिहादींकडून 2 जवांनाच्या मृतदेहाची विटंबना
पुंछ, 22 डिसेंबर (हिं.स.) : जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये आतापर्यंत 5 जवानांना हौतात्म्य आलेय. याठिकाणी गुरुवारी दुपारी 3.45 वाजता जिहादी दहशतवाद्यांनी सैन्याच्या तुकडीवर हल्ला केला होता. यात 5 जवानांना वीरमरण आले असून 2 जण जखमी आहेत. दरम्यान जिहादी दहशतवाद्यांनी 2 मृतदेहांची विटंबना केल्याची संतापजनक घटना घडली आहे.
पाकिस्तानची जिहादी दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाशी संबंधित एँटी फॅसीस फ्रंट नामक दहशतवादी टोळी जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील डेरा की गली भागात दबा धरून बसली होती (अँबुश) यापरिसरात सैन्याची तुकडी शध मोमिहम राबवत असताना सुरनकोट भागातील डेरा की गली व बुफलियाज यादरम्यान वळणावर जिहादी दहशतवाद्यांनी सैन्याच्या तुकडीवर हल्ला केला. त्यानंतर या परिसरात चकमक सुरू झाली. यात 7 जवानांना गोळ्या लागल्या. चकमकीच्या ठिकाणी योग्य पोजीशन घेण्यासाठी जवानांना आजुबाजुला पोझिशन घेण्यासाठी सरकावे लागले. यावेळी धारातीर्थी पडलेल्या 2 जवानांच्या मृतदेहांची जिहादी दहशतवाद्यांनी विटंबना केली. दरम्यान अतिरिक्त कुमक घटनास्थळी रवाना झाली असून सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहिम हाती घेतल्याचे संरक्षण प्रवक्ते ले. कर्नल सुनील बरतवाल यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार
