cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > मुंबईत शिवसंस्कार काव्यदालन आणि संगीत शिवस्वराज्यगाथेचे आयोजन
Regional

मुंबईत शिवसंस्कार काव्यदालन आणि संगीत शिवस्वराज्यगाथेचे आयोजन

CliQ INDIA
Last updated: December 21, 2023 6:30 pm
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, २१ डिसेंबर (हिं.स.) : सईशा प्रोडक्शन्स, मुंबई आणि बोरिवली सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्यांदाच बोरिवलीत छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवचरित्र या विषयांना संपूर्णतः वाहिलेल्या तीन दिवसीय भव्य अशा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ३५० व्या शिवराज्याभिषेकाचा वर्षसोहळा हे याचे निमित्त आहे.

सदर उपक्रमाची तीन दिवसीय रूपरेषा खालीलप्रमाणे –

1. शिवसंस्कार काव्यदालन – संपूर्ण शिवचरित्र, आपली संस्कृती, आपले गडदुर्ग, शिवकाळातील परिचित-अपरिचित योद्धे आणि अशा सर्वच विषयांवर आधारित १०० चित्रकाव्यांचे भव्य प्रदर्शन दि. २२ ते २४ डिसेंबर या कालावधीत ज्ञानसागर अँफी थिएटर येथे भरविण्यात येणार आहे. दि. २२ डिसेंबर संध्याकाळी ५ ते ९ आणि दि. २३ व २४ डिसेंबर सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत. (हे काव्यदालन विनामूल्य असेल.)

2. शिवचरित्रातून प्रेरणा – भारतीय सैन्यातील मराठा लाईट इन्फेन्ट्रीचे ट्रेनिंग ऑफिसर कॅप्टन पी. विक्रम यांचे शिवचरित्रातून प्रेरणा आणि मराठा रेजिमेंन्टचे कर्तृत्व यावर स्फूर्तिदायी व्याख्यान दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवार, दि. २३ डिसेंबर रोजी सायं. ५.३० वाजता. (प्रवेश विनामूल्य).

3. संगीत शिवस्वराज्यगाथा या संपूर्ण शिवशाहीवर आधारित ४२ नवगीतांमधून साकारलेल्या धगधगत्या संगीतमय शिवचरित्राचे सादरीकरण रविवार, दि. २४ डिसेंबर रोजी सायं. ६.३० वाजता होईल. गायक श्रीरंग भावे, नचिकेत देसाई, केतकी भावे जोशी हे असतील, तर ओघवत्या शैलीतील शिवचरित्र कथन पद्मश्री राव यांचे असेल. शिवकाव्यांचे सादरीकरण हे स्वतः अनिल नलावडे करतील. या गीतांना भव्य एलईडी स्क्रीनवर जुन्या ऐतिहासिक चलचित्रांची साथसोबत असेल. (प्रवेशशुल्क: रु. १५०/- तिकिटांसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करावा).

अशा या शिवचरित्रातील आचार, विचार, संस्कारांनी प्रेरित तीन दिवसीय भव्य उपक्रमास आपण सर्वांनीच आपल्या कुटुंबियांसहित, मित्रपरिवारांसहित भेट द्यावी. तसेच शाळा, महाविद्यालये आणि परिसरातील तरुण पिढीने याचा जरूर तो लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी ९८२१५५४१३० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सईशा प्रोडक्शन्स, मुंबई आणि बोरिवली सांस्कृतिक केंद्र करीत आहेत.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

नको असलेले मूल कुठेही टाकून देऊ नका; टोल फ्री क्रमांकाला संपर्क साधा
लासलगाव येथे आयुष्यमान भव आरोग्य विषयक मोहीम
रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठीची सवलत पुन्हा सुरू करावी – दीपक केसरकर
संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यात जोरदार ‘सामना’ – नवनाथ बन
राजकीय पक्षांनी आरक्षणाबाबत  आपली भूमिका लेखी कळवावी – मुख्यमंत्री | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article मालाडमध्ये वॉचमनकडून चिमुकलीवर क्लासरूममध्येच अत्याचार, आरोपीला अटक
Next Article कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ या मराठी कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?