cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > आत्मनिर्भर स्त्रिया स्वतःच्या कल्याणाबरोबरच परिवार-समाजाचेही कल्याण करतात – पंतप्रधान
National

आत्मनिर्भर स्त्रिया स्वतःच्या कल्याणाबरोबरच परिवार-समाजाचेही कल्याण करतात – पंतप्रधान

CliQ INDIA
Last updated: December 17, 2023 3:30 am
CliQ INDIA
Share
6 Min Read
SHARE

* केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे आत्मनिर्भर झाल्याची लाभार्थ्यांची भावना

* महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्र्यांची प्रमुख उपस्थिती

नवी दिल्ली, 16 डिसेंबर (हिं.स.) –

केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती गावोगावी पोहोचवणाऱ्या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातील अनेक लाभार्थ्यांशी संवाद साधला.

आपल्या देशातील आत्मनिर्भर स्त्रिया स्वतःच्या कल्याणाबरोबरच परिवार आणि समाजाचेही कल्याण करतात आणि अशा दृढनिश्चयी लोकांसाठीच विद्यमान केंद्र सरकार काम करत आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. ते आज विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान लाभार्थी संवाद कार्यक्रमात बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पंतप्रधानांनी मुंबईत कांदिवली येथे राहणाऱ्या मेघना गुरव यांच्याशी संवाद साधत त्यांची माहिती घेतली. विविध योजनांमुळे मेघना यांच्यासह त्यांच्या बचतगटातील इतर स्त्रियांच्याही आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पडल्याचे त्यातून उलगडत गेले. पूर्वी पदपथावर खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या मेघना यांना मुद्रा योजनेतून कॅनरा बँकेमार्फत मिळालेल्या 90 हजार रुपयांच्या कर्जाने, त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आवश्यक ती सामग्री विकत घेऊन त्यांनी एकटीच्या हिंमतीवर व्यवसायाचा पसारा वाढवला. त्यानंतर मंजूर झालेल्या शैक्षणिक कर्जाच्या मदतीने त्यांच्या मुलाला परदेशी शिक्षणासाठी पाठवता आल्यामुळे ‘एक एकल माता’ म्हणून त्यांना विशेष समाधान झाले, असे मेघना यांनी यावेळी सांगितले. पुढे मेघना यांनी पीएम स्वनिधी योजनेतून कर्जाची उचल केली. योजनेची सुयोग्य माहिती त्यांना प्राप्त झालेली असल्याने हप्ते वेळेवर भरणाऱ्यास पुढे पुढे कमी दराने मिळणाऱ्या अधिक कर्जाची माहिती त्यांना आहे व व्यवसायवृद्धीच्या दृष्टीने त्यांनी तशा अधिक कर्जाची उचल करण्याचे नियोजनही केले आहे.

मेघना यांनी केंद्र सरकारच्या योजनांच्या मदतीने स्वतःचा संसार सावरण्याबरोबरच बचत गटातील 25 भगिनींना काम दिले. पीएम कौशल्य विकास योजनेद्वारे या स्त्रियांनी शिवणकामाचे प्रशिक्षण घेतले व आता त्या जोरावर त्यांना ठिकठिकाणची शिवणाची कामे तर मिळतातच, पण त्यांनी केलेल्या रजया परदेशातही जातात, हे ऐकून पंतप्रधानांनी त्यांची विशेष प्रशंसा केली.

या दृकश्राव्य संवाद कार्यक्रमासाठी मुंबईत मालाडमध्ये जनकल्याण नगर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, खासदार गोपाळ शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.

चंद्रपुरात आयोजित अशाच कार्यक्रमात केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पंतप्रधानांशी विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांबरोबर होणाऱ्या संवादात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी सांगितले की मे 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यभार हाती घेतल्यानंतर सर्वांसाठी घरे, एलपीजी कनेक्शन, नळ जोडणी यात लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. लखपती दीदी या माध्यमातून शिवणकाम, प्लम्बिंग तसेच तत्सम उद्योगातून महिलांना लखपती करण्याचा चांगला पुढाकार घेतला आहे. यामुळे अनेक महिला आता आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर झाल्या आहेत. ड्रोन दीदी माध्यमातून ड्रोनचे प्रशिक्षण देऊन महिलांना कृषी क्षेत्रात ड्रोन वापराने रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत, असे पुरी यांनी सांगितले. या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्यासह राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी देखील बुलडाणा जिल्ह्यात आल्यानंतर चिखली तालुक्यातील पेठ येथील भारत संकल्प रथयात्रेत भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील भारत सरकारच्या महत्त्वकांक्षी योजनांबाबत माहिती जाणून घेतली. तसेच मिळालेला लाभ याबाबत त्यांची मते जाणून घेतली व लाभार्थ्यांची संवाद साधला यावेळी त्यांचे समवेत चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगर शहरातील मोहाटादेवी चौक, बजाज नगर येथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी भेट दिली. याप्रसंगी त्यांनी नागरिकांना विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. आरोग्य आणि बाकीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आशा सेविकांची भूमिका महत्त्वाची आहे असे मंत्री म्हणाले. या यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना नागरिकांनी जाणून घ्याव्यात, त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. कराड यांनी केले. सामान्यांच्या गरज्यांच्या पूर्तीसाठी ही यात्रा महत्वपूर्ण आहे असे मत या प्रसंगी राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केले. डॉ कराड यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना आयुषमान भारत योजना कार्ड देण्यात आले.

विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातल्या चिखली इथं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या ठिकाणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पा. दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू असलेल्या या कार्यक्रमात लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत देशभरातील अनेक लाभार्थ्याशी दूरस्थ पद्धतीने संवाद साधला. या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील रांजणगाव तालुका शिरूर येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय अर्थ राज्य मंत्री पंकज चौधरी उपस्थित होते. भारताच्या विकास प्रक्रियेत सर्वसामान्य लोकांना सहभागी करून घेण्यासाठीच विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली असून देशातील सामान्य नागरिकांचा विकास झाला तरच भारत जगात विकसित राष्ट्र म्हणून उदयाला येईल, असे मत पंकज चौधरी यांनी यावेळी व्यक्त केले.

मुंबई दक्षिण मधील काँटनग्रीन परिसरातल्या शहीद भगतसिंग मैदानातही विकसित भारत संकल्प यात्रा पोहचली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दूरदृष्यप्रणालीच्या माध्यतातून देशभरातल्या लाभार्थ्यांशी साधलेल्या संवादाचे थेट प्रसारण करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणारे स्टाँल लावण्यात आले होते. तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबीर भरवण्यात आले होते.

शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांसाठी पात्रता असूनही, ज्या लोकांना विकासाच्या प्रवाहात येता आले नाही, त्यांना शासकीय योजनांचा विविध लाभ मिळावा, या उद्देशाने हाती घेतलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये 47 हजार 164 लाभार्थ्यांपैकी 23 हजार 668 पुरुष तर 22 हजार 845 स्त्रिया व 652 अतिमहत्वाच्या व्यक्तींनी सहभाग घेतला आहे.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

अयोध्या : दीपोत्सवासाठी 51 घाट सुसज्ज
सप्टेंबरमध्ये आरपीएफकडून ‘ऑपरेशन नन्हें फरिश्ते’ अंतर्गत 895 बालकांची सुटका
आग्रा येथे छत्रपतींचे स्मारक उभारणार- मुख्यमंत्री | BulletsIn
अवकाशात 13 व 14 डिसेंबरला अनुवता येईल उल्का वर्षाव | BulletsIn
असंघटित कामगारांच्या गृहप्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार लोकार्पण

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article मराठा समाजाला शिक्षणात व नोकरीत आरक्षण हवे – आ.आवताडे
Next Article किशोर सूर्यवंशी मेमोरियल ट्रॉफी आंतर तालुका क्रिकेट स्पर्धा रविवारपासुन रंगणार
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?