cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > कणकवली डीपी प्लान जनतेला फसवून लागू केला – सुशांत नाईक
Regional

कणकवली डीपी प्लान जनतेला फसवून लागू केला – सुशांत नाईक

CliQ INDIA
Last updated: December 11, 2023 5:00 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

सिंधुदुर्ग, 10 डिसेंबर (हिं.स.) : कणकवली नगरपंचायतच्या मार्फत नगर रचना योजना (टी. पी. स्कीम) मंजूर करण्यात आली असून त्याची नोटीस नुकतीच ०८/१२/२०२३ रोजी प्रहार वृत्तपत्र मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. या नोटीसद्वारे कणकवली शहरातील सलग २० हेक्टर जमीन संमती पत्राद्वारे नगरपंचायतला दिल्यास या जमिनीमध्ये प्लॉटिंग,रस्ते, गटार या छोट्या शहरांसारख्या वेगवेगळ्या सोयी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. शहरात हि योजना मंजूर झाली म्हणजे कणकवली शहराचा शहर विकास आराखडा मंजूर झाल्याचे हे उदाहरण असून सत्ताधारी आमदार नितेश राणे व जमिनीची दलाली करणाऱ्या त्यांच्या निकटवर्तीयांच्या माध्यमातून कणकवली शहरवासीयांना अंधारात ठेवून शहर विकास आराखडा करण्यात आला आहे. कणकवली शहर वासियांना यांची कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही, हा मनमानी कारभार आहे असा आरोप युवासेना जिल्हाप्रमुख तथा कणकवली नगरपंचायतचे माजी गटनेते सुशांत नाईक यांनी केला आहे.

सुशांत नाईक पुढे म्हणाले, कणकवली शहरात नगर रचना योजना (टी. पी. स्कीम) मंजूर झाली याचा अर्थ कणकवली शहर विकास आराखडा अंतिम झाला आहे. कणकवली शहरवासीयांसाठी हा आराखडा खुला करण्याची आवश्यकता असताना देखील सत्ताधारी आमदारांच्या दबावाखाली हा आराखडा लपवून ठेवण्यात आला आहे. कणकवली शहरातील सलग २० हेक्टर जमीन या योजनेअंतर्गत घेतली जाणार असून ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांत याकरिता जमीन मालकांनी प्रस्ताव द्यावयाचे आहेत. या प्रस्तावामध्ये सलग २० हेक्टर जमीन व ७० ते ८० टक्के लोकांची संमती असणे आवश्यक आहे. शहरात सोयी सुविधा देण्याकरिता केंद्र शासनामार्फत कणकवली नगरपंचायतला बिनव्याजी कर्ज मिळणार असून पन्नास वर्षाकरिता हे कर्ज असणार आहे.

मात्र एकीकडे कणकवली शहराच्या शहर विकास आराखड्याचा डीपी प्लान प्रलंबित असल्याचे भासवले जात आहे तर दुसरीकडे कणकवली शहरात नगर रचना योजना (टी. पी. स्कीम) राबविण्याची नोटीस काढली आहे. सत्ताधारी आमदार नितेश राणे व त्यांचेच काही जमिनीचे दलाल पडद्यामागून या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी असल्याचा आरोप सुशांत नाईक यांनी केला आहे. याबाबत मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन कणकवली शहर विकास आराखडा हा जनतेसाठी खुला करण्याची मागणी आपण करणार आहोत. आणि जर येत्या काळात शहर विकास आराखडा जनतेसाठी खुला झाला नाही व सत्ताधारी आमदार नितेश राणेंसाठी प्रशासन काम करत असेल तर कणकवली शहरावर होणारा अन्याय खपवून घेतला नाही. राज्यात व केंद्रात असलेल्या सत्तेचा गैरवापर करून आमदार नितेश राणे प्रशासनाला पुढे करत अशा प्रकारे कणकवली शहराच्या जनतेची दिशाभूल करत आहेत. शहरवासीयांना अंधारात ठेवून शहर विकास आराखडा मंजूर करणे आम्ही खपवून घेणार नाही व जमिनीच्या दलालांसाठी शहरवासीयांची फसवणुक केल्यास कणकवली शहर शिवसेना व युवासेनेमार्फत तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा सुशांत नाईक यांनी दिला आहे.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

पिपंरी -संकल्प शाश्वत विकासाचा घोषवाक्यासह भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
मध्य रेल्वेच्या ७ अधिकाऱ्यांना 'अति विशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार'
छ. संभाजीनगर : नवतेजस्विनी प्रकल्पः ‘माविम’बचतगटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन | BulletsIn
चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाई फेकीचे समर्थन करीत नाही – रोहित पवार
दिल्लीतील अमृतवाटिकेत ठाण्यातील माती जाणे हे अभिमानास्पद – जिल्हाधिकारी

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article विदर्भस्तरीय शिवदौड मॅरेथॉन स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद
Next Article गडचिरोलीत पोलीस पाटलाच्या हत्येप्रकरणी कट्टर जनमिलिशियास अटक
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?