सोलापूर 1 डिसेंबर ( हिं.स) प्रवाशांकडून तिरुपती – साईनगर शिर्डी साप्ताहिक या गाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवाय या मार्गावर प्रवाशांच्या सोईसाठी दक्षिण मध्य रेल्वे पुढील विशेष गाड्यांची मुदत वाढवण्यात आली आहे.ही गाडी आता २८ जानेवारी २०२४ पर्यंत धावणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
तिरुपती – साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष गाडी २६ नोव्हेंबर पर्यंतच धावणार होती.या गाडीची मुदत वाढविण्यात आली आहे. शिवाय साईनगर शिर्डी – तिरुपती साप्ताहिक विशेष गाडी २७ नोव्हेंबर ऐवजी २९ जानेवारी २०२४ पर्यंत वाढविण्यात येणार आहे. या गाडीला २१ कोचेस – एक एसी२ टीयर, २ एसी३ टीयर, १४ स्लीपर क्लास, २ सामान्य द्वितीय श्रेणी, २ गार्ड ब्रेक वैन अशी रचना आहे. या गाड्यांच्या वेळ आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. प्रवाशांनी विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार
