सोलापूर 24 नोव्हेंबर ( हिं.स) : पोलिस असल्याची बतावणी करीत दोघेजण सराफ दुकानात शिरले. त्यांनी लहान मुलांची अंगठी घेण्याचे कारण सांगत ड्राव्हरमधील साधारण २ लाख ३२ हजार रुपयांच्या सोन्याच्या चार बांगड्या घेऊन पसार होण्याचा धक्कादायक प्रकार पूर्व मंगळवारपेठेतील सराफ बाजारामध्ये घडला.या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. विलास उद्धवराव वेदपाठक (वय- ३५, रा. काटगाव, ता. तुळजापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
शहरामधील सराफ बाजारात दोघे अनोळखी व्यक्ती विलास उद्धवराव वेदपाठक यांच्या पूर्व मंगळवार पेठेतील मनोज ज्वेर्ल्स या दुकानात आले. त्यांनी आपण पोलिस आहोत असे त्यांना सांगितले. लहान मुलासाठी अंगठी घ्यायची आहे म्हणून त्यांनी दाखवण्या सांगितले. या दरम्यान, त्यांनी ड्रॉव्हरमधील ४०.७५० ग्रॅम वजनाच्या ९१६ होलमार्कच्या ४ सोन्याच्या बांगड्या पाहिल्या. वेदपाठक यांच्या नकळत त्या घेतल्या आणि निघून गेले.
हिंदुस्थान समाचार
