अमरावती, 18 नोव्हेंबर, (हिं.स.) – जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये उद्या महामुकाबला रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषक 2023 चा महाअंतिम सामना रंगणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना खेळल्या जाणार आहे.भारत हा सामना जिंकावा अशी प्रत्येक भारतीयांची इच्छा आहे आणि भारतीय टीमला विशेष शुभेच्छा देण्यासाठी आज अमरावती शहरात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली आहे.
अमरावती शहराचे पोलीस आयुक्त नविन चंद्ररेड्डी यांच्या हस्ते या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.अमरावती शहरात कॅम्प परिसरात असलेले हॅलो कॉर्नर या दुकानात भारतीय टीमला शुभेच्छा देण्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली या वेळी पोलीस आयुक्तांच्या हस्ते हस्ताक्षर करत या मोहिमेला सुरुवात झाली. या वेळी पोलीस विभागाचे अधिकारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारत नक्कीच जिंकेल असा विश्वास पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी व्यक्त करीत भारतीय क्रिकेट टीमला शुभेच्छा दिल्यात.या वेळी चक दे इंडिया ,जितेंगा भाई जितेंगा इंडिया जितेंगा च्या घोषणेने परिसर दुमदुमला होता.
यावेळी नविनचंद्र रेड्डी पोलीस आयुक्त, डीसीपी विक्रम साळी, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक राहुल आठवले,फ्रेजरपूरा पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव,संजय गुल्हाने,अनिल कुरळकर ,ऍड.प्रशांत देशपांडे,प्रा. संजय तिरथकर,सलीम मीरावाले,हाजी रम्मुसेठ,आसिफ अथर अली,नितीन महाशब्दे ,सुनील भोळे,अजय डांगे,साहेब हुसेन सुभेदार ,फेजान अली,ऍड मनीष शिरसाठ ,अमोल पाटील ,डॉ.अजीज खान सह अनेक क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार
