cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Entertainment > झी मराठी कलाकारांचे क्रिकेट प्रेम
Entertainment

झी मराठी कलाकारांचे क्रिकेट प्रेम

CliQ INDIA
Last updated: November 18, 2023 7:30 pm
CliQ INDIA
Share
5 Min Read
SHARE

मुंबई, 18 नोव्हेंबर (हिं.स.) इंडिया ! इंडिया ! हा गजर ऐकला की कळून येतं की मॅच चालू आहे. भारतात क्रिकेट हा श्वास, तर काहींचा धर्म आहे. येणाऱ्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी आणि विश्वचषक आपल्या भारतात परत आणण्यासाठी रोहित आणि संघ तयार आहे. भारताने या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत सर्वच्या सर्व सामने जिंकले आहेत. या निमित्ताने झी मराठीचे आवडते कलाकार तुमच्या समोर त्यांचे क्रिकेट प्रेम व्यक्त करीत आहेत.

‘सारं काही तिच्यासाठीची’ उमा म्हणजेच खुशबू तावडे ‘ मी शाळेत महिला क्रिकेट संघाची भाग होती आणि राज्य स्तरावर क्रिकेट खेळली आहे. मला आज ही लक्षात आहे आमच्या म्हात्रे गुरुजींनी घोषणा केली होती की महिलांचा क्रिकेट संघ आपण बनवतोय ज्यांना इच्छा आहे त्यांनी आपली नाव नोंदवावी. पहिल्यांदा सीजन बॉल हातात घेतला आणि मी क्रिकेटच्या प्रेमात पडले. बॅटिंग पेक्षा बॉलिंग करण्यामध्ये मला जास्त मजा यायची कारण बॅट आणि माझी उंची एकच होती तेव्हा तर बॅट पकडायची म्हणजे माझ्यासाठी तारेवरची कसरत होती. पण मग दहावीतला अभ्यास आणि तितकस मार्गदर्शन न मिळाल्यामुळे माझं क्रिकेट खेळणं सुटलं. क्रिकेट लहानपणा पासून माझ्यासाठी खूप जवळचा विषय राहिला आहे. भारतीय टीमला विश्वचषक मध्ये खेळताना बघायची नेहमीच उत्सुकता असते. १९ नोव्हेंबरला जरी शूट करत असली तरी सेटवर आमचं नियोजन चालू आहे. माझ्या मोबाईल मध्ये मॅचचे अपडेट नोटिफिकेशन चालूच राहणार. माझा आवडता खेळाडू हार्दिक पंड्या आहे ज्याला मी ह्या सामन्यामध्ये मिस करणार आहे. भारतीय टीमला इतकंच सांगेन बोलीन ‘तुम्ही बेफिकिर होऊन खेळा आम्ही तुमच्या सोबत आहोत’

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ नेत्रा म्हणजे तितिक्षा तावडे ‘ खूप जास्त उत्साही आहे. पण १९ नोव्हेंबरला आमचं शूट असणार आहे. आमच्या सेटवर सर्व क्रिकेट प्रेमी आहेत तर मोबाईलवर का होईना पण मॅच जरूर बघणार. आम्ही सर्व एकत्र सेटवर प्रत्येक विकेट आणि सेंचुरी साजरी करणार. क्रिकेट आणि माझं नातं अतूट आहे मला कुठेही एक फळी जरी मिळाली तरीही मी क्रिकेट खेळायला सुरु करते. मी साधारण ८ वर्षाची असल्यापासून क्रिकेट खेळायला सुरवात केली आणि १२वी ला जाईपर्यंत मी क्रिकेट खेळात होते. मी राष्ट्रीय स्तरावर ही क्रिकेट खेळली आहे. ह्या वेळी सेटवर विश्वचषक पाहण्याचा आनंदच वेगळा असणार आहे.

‘सारं काही तिच्यासाठी’ ची दक्षता जोईल म्हणजेच निशिगंधा, ‘अभिमान आहे मला आपल्या भारतीय संघाचा ज्या प्रकारे त्यांनी विश्वचषकची प्रत्येक मॅच गाजवली आहे. १९ नोव्हेंबरच्या अंतिम मॅचची जिज्ञासा अजून वाढली आहे. माझं क्रिकेटच नातं तेवढं दाट नसलं तरीही लहानपणी मित्रांसोबत गल्ली क्रिकेट खेळण्याची आठवण माझ्या मनात अजूनही आहे. सर्वात जास्त मला जे आवडत तो म्हणजे भारतीयां मधला तो जोश. त्या दिवशी रस्ते सुमसाम असणार हे नक्की आहे आणि घराघरात थरारक ऊर्जा दिसून येणार आहे. भारतीय टीमला एकच सांगणं आहे की संपूर्ण भारत तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही निश्चितं होऊन खेळा.

रुची कदम म्हणजेच ‘सारं काही तिच्यासाठी’ मधली ओवी, क्रिकेटची माझी आवडती आठवण म्हणजे बाबांसोबत क्रिकेटचे महारथी सचिन तेंडुलकर आणि अनिल कुंबळेला खेळताना पाहिलेला क्षण. मी खूप लहान होती मला तितकस आठवत नाही पण मला लक्ष्यात आहे बाबा ज्या विद्यालयात शिक्षक होते तिथे हे दोघे खेळायला आले होते. आम्ही सर्व त्यांना खेळताना बघायला गेलो होतो. मला क्रिकेटची जितकी माहिती आहे ती माझ्या बाबांमुळे. १९ नोव्हेंबरला आम्ही आमच्या मालिकेचा महासंगम विशेष भाग शूट करत असू, तरी शूटिंग आणि मॅचचा स्कोर अश्या दोन गोष्टींवर आमचं लक्ष असणार आहे.

‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेतला अभिषेक गावकर म्हणजेच तुमचा लाडका श्रीनु, ‘मी चाळीत लहानपणापासून राहल्यामुळे गल्ली क्रिकेट रोज खेळायचो आणि माझ्या घरी क्रिकेटच छोटं किट असायचं. मी ऑल राऊंडर होतो आणि आता ही जेव्हा सेलिब्रिटी क्रिकेट मॅच होतात तेव्हा मी वेळ काढून खेळायला जातो. मला इतकं क्रिकेटच वेड आहे की, मी वरळीला राहत असल्यामुळे वानखडे स्टेडियम मध्ये खूप वेळा भारताची मॅच पाहायला जायचो. आज मी जर कलाकार नसतो आज तर नक्कीच क्रिकेटर असतो. भारतीय संघाने विश्व चषकाच्या प्रत्येक टप्यावर आतापर्यंत जे यश मिळवलं आहे. मला विश्वास आहे वर्ल्ड कप ही भारतच घरी आणणार.

पाहायला विसरू नका ‘सारं काही तिच्यासाठी’ संध्या ७:०० वाजता आणि ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ १०:३० वाजता

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

‘अष्टपदी’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण | BulletsIn
250 कोटी रुपयांचे कर्ज भरून बासू भगनानी यांना कार्यालय विकले | BulletsIn
पापाराझींच्या कृत्यावर अभिनेत्री नेहा शर्मा संतापली
कै. मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मापुस्कर ब्रदर्स घेऊन येत आहेत ‘एप्रिल मे ९९’ | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article अमरावतीत भारतीय क्रिकेट टीमला शुभेच्छा देण्यासाठी स्वाक्षरी मोहीम
Next Article भेसळयुक्त दूध विक्री प्रकरणी डेअरीचालकाविरुद्ध गुन्हा
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?