cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > नको असलेले मूल कुठेही टाकून देऊ नका; टोल फ्री क्रमांकाला संपर्क साधा
Regional

नको असलेले मूल कुठेही टाकून देऊ नका; टोल फ्री क्रमांकाला संपर्क साधा

CliQ INDIA
Last updated: November 15, 2023 1:00 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

चंद्रपूर 14 नोव्हेंबर (हिं.स.): – नको असलेली गर्भधारणा झाली आणि गर्भपातही करता आला नाही, तर मग जन्माला आलेल्या मुलाचे काय करायचे, असा विचार करून ते बेवारस ठिकाणी सोडून दिले जाते. मात्र असे न करता संबंधित जन्माला आलेल्या अर्भकांना सुरक्षित निवारा प्रशासनाकडून देण्यात येतो. त्यामुळे नको असलेले मूल टाकून देऊ नका, असे आवाहन महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे. तसेच याबाबत टोल फ्री क्रमांक 1098 वर संपर्क साधावा, असेही विभागाने म्हटले आहे.

जिल्ह्यात महिला व बालविकास विभाग, बालकल्याण समिती, किलबिल दत्तक संस्था, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन यांच्यासह पोलिस विभाग, आरोग्य विभाग अशा सर्व यंत्रणांकडून नवजात अर्भकांना सुरक्षित स्थळी ठेवण्याचे काम करण्यात येते. शहरासह जिल्ह्यात सार्वजनिक, तसेच बेवारस ठिकाणी नवजात अर्भक सापडल्याचे प्रकारही मागील काही वर्षांत घडले आहेत. अशा प्रकरणांमध्ये पोलिसांनी गुन्हेसुद्धा दाखल केले आहेत.

नको असलेले मूल जन्माला आले तर : प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे एखाद्या घटनेत मूल नको असल्यास व जन्म द्यावा लागला व त्यानंतर पालनपोषण करण्यास असमर्थ असल्यास संबंधितांनी त्याबाबतची माहिती हेल्पलाईनच्या 1098 या टोल फ्री क्रमांकावर तसेच पोलिस यंत्रणेला द्यावी. यामध्ये संबंधिताचे नाव गोपनीय ठेवले जाते.

येथे संपर्क करा :

जिल्हा बाल संरक्षण कक्ष : जिल्हा स्तरावर ही यंत्रणा कार्यरत असून नवजात बालकाची माहिती मिळाल्यास योग्य पुर्नवसन होईपर्यंत बालकासोबत काम करत असते.

चाईल्ड हेल्पलाईन : 1098 या क्रमांकावर माहिती दिल्यास संबंधिताचे नाव गोपनीय ठेवले जाते. बालकल्याण समितीला माहिती देऊन पुढील कारवाही चाईल्ड हेल्पलाईन करीत असते.

बालकल्याण समिती : जिल्हा स्तरावरील बालकल्याण समितीला माहिती दिल्यास समितीच्या आदेशान्वये पुढील कारवाही करून त्या नवजात बाळाला ताब्यात घेतले जाते.

पोलिस विभाग : जिल्ह्यात जिवंत अर्भक सापडल्याचा घटनांमध्ये अज्ञात महिला, मातेविरुद्ध यापूर्वी अनेक प्रकरणांमध्ये गुन्हाही दाखल केला आहे. ‘अर्भक मृत’ आढळल्यास याबाबतसुद्धा गुन्हा दाखल केला जातो.

बाल कल्याण समिती घेते काळजी : नको असलेले मूल जन्माला आल्यानंतर त्याला टाकून देण्याऐवजी बालकल्याण समितीकडे संपर्क साधावा. समिती सर्व अर्भकांना सुरक्षित ठेवते.

महिला हेल्पलाईन (1091): बेवारस बाळ आढल्यास महिला हेल्पलाईनलासुद्धा माहिती देता येते. हेल्पलाईनचे सदस्य पोलिसांच्या मदतीने बाळाला ताब्यात घेऊन प्रक्रिया करतात.

पोलिसांचा भरोसा सेल : प्रत्येक पोलिस ठाण्यात भरोसा सेलची स्थापना करण्यात आली आहे. या सेलकडेही अशा घटना संदर्भात माहिती देता येते.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा क्षमा बासरकर, सदस्या ज्योत्स्ना मोहितकर, अमृता वाघ, वनिता घुमे, सर्व पोलीस स्टेशन, बाल पोलिस पथक, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, किलबिल प्राथमिक बालगृह दत्तक संस्था सरचिटणीस प्रभावती मुठाळ, हेमंत कोठारे, उपाध्यक्षा वंदना खाडे, सदस्या शीतल गौरकार, चाईल्ड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक अभिषेक मोहूर्ले, अंगणवाडी सेविका आदी जिल्ह्यातील बालकांचे पुनर्वसन करीता महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात, असे महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

ग्राम विकासाची राष्ट्रीय चळवळ निर्माण व्हावी – पोपटराव पवार
धुळ्यातील पोलीस पाटील, कोतवाल पदाची भरती प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगीत
शेंडापार्क परिसरात आयटी पार्क उभारण्यात यावे – अजित पवार
पिढ्यानपिढ्या वाहणारा भावभक्तीचा अखंड प्रवाह म्हणजे ‘वारी’ – रविंद्र चव्हाण | BulletsIn
बॅंकांच्या शाखांनी दरमहा एक कर्ज प्रकरण निकाली काढावे – बुलडाणा जिल्हाधिकारी

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article गुजराती नववर्षानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
Next Article गोवा : धावपट्टीवर कुत्रा आल्याने मागे फिरले विमान
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?