‘एकदा येऊन तर बघा’च्या टीमने केले दिवाळी सेलिब्रेशन
मुंबई, १ नोव्हेंबर, (हिं.स) दिग्दर्शन, कलाकार, लेखक यासारख्या सगळ्या भूमिका प्रसाद खांडेकर याने पार पाडल्या आहेत त्यामुळे मला तो चिवड्यासारखा वाटतो, असे अभिनेत्री नम्रता संभेराव हिने म्हटले. दिवाळीत होणाऱ्या फराळामधील कोणत्या पदार्थासाठी तू प्रसादची निवड करशील असे विचारले असता तिने असे म्हटले. तसेच त्याने लवकरच निर्माता ही व्हावे अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली. आज दादर येथे ‘एकदा येऊन तर बघा’च्या टीमने दिवाळी सेलिब्रेशन केले. यावेळी गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, राजेंद्र शिसातकर, नम्रता संभेराव हे उपस्थित होते. यावेळी कलाकार ‘आली आली गं भागाबाई’ या गाण्यावर थिरकले.
प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपकपेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायणमूरथी, डॉ.झारा खादर यांची आहे. या चित्रपटातील ‘आली आली गं भागाबाई’ हे हे गीत नुकतंच प्रदर्शित झाल. प्रेक्षकांनीही या गाण्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे.
गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, विशाखा सुभेदार, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, राजेंद्र शिसातकर, नम्रतासंभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार आदी तगडे कलाकार या चित्रपटात आहेत.
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गांवकर
