मुंबई, 05 फेब्रुवारी (हिं.स.)। ‘शुभ श्रावणी’ मालिकेत मोक्षाच्या लग्नाची लगबग सुरु आहे. हा मोक्षाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे, पण लग्नाच्या आनंदात अचानक मोक्षाचा एक्स बॉयफ्रेंड येऊन तिला ब्लॅकमेल करणार आहे. या सगळ्या प्रकारामुळे मोक्षा पूर्णपणे खचून जाते आणि आत्महत्येच्या प्रयत्नात असतानाच श्रावणी तिथे पोहोचते, मोक्षाला समजावत तिला धीर देते. मन मोकळं करत मोक्षा श्रावणीसमोर सर्व सत्य मांडते. त्यानंतर शुभ आणि श्रावणी, मोक्षाच्या एक्स बॉयफ्रेंडला गाठतात. यावेळी प्रेक्षकांना शुभचा जबरदस्त फाईट सिक्वेन्स पाहता येणार आहे. दुसरीकडे अलकनंदा आणि मदनने अफवा पसरवली आहे की शुभ श्रावणी पळून गेले आहेत. एकीकडे मोक्षाचे लग्नविधी सुरू होतात. श्रावणी मोक्षाला स्पष्ट सांगते की घडलेलं सगळं तू कार्तिकला सांग आणि त्यानंतरच या लग्नासाठी उभी राहा. मोक्षा सप्तपदीसाठी उभी असताना मोक्षाला श्रावणीचं बोलणं आठवतंय. ती कार्तिकला बाजूला घेऊन त्याला सर्व सत्य सांगते. हे ऐकून कार्तिक तिथून निघून जातो. सर्वांना वाटतं की लग्न तुटलं. पण…. *आता मोक्षाचं लग्न निर्विग्नपणे पार पडेल ?*
*दुसरीकडे नवरदेवाची चप्पल चोरण्याचा नादात चुकून अलकनंदाची चप्पल चोरीला जाते. त्या चप्पलेखाली अलकनंदाने विश्वंभरचा फोटो लावला आहे. आता ही चप्पल जेव्हा सगळ्यांसमोर येईल तेव्हा काय होणार ?*
*रोमांचक आणि नाट्यमय गोष्टीने नटलेले शुभ श्रावणीचे हे भाग पाहायला विसरू नका, दररोज संध्या ७:०० वा. फक्त आणि फक्त आपल्या झी मराठीवर.*
—————
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर
