cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Article > शक्ती समजून घेताना
Article

शक्ती समजून घेताना

CliQ INDIA
Last updated: October 23, 2023 3:50 pm
CliQ INDIA
Share
4 Min Read
SHARE

सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. गल्लोगल्ली दिवसभर कर्णकर्कश आवाजाची ध्वनीयंत्र कोकलत आहेत. महिलावर्ग विशिष्ट एका रंगाच्या साड्या परिधान करत आहेत. रात्रभर दांडिया,गरब्याच्या नावाखाली धिंगाणा सुरू आहे. पण या सर्वांमध्ये नवरात्रोत्सव म्हणजे काय? कुणाचा उत्सव? कुणाचा जागर? शक्ती म्हणजे काय? तिचे स्वरुप काय? याची कुणालाच काही पडलेली नाही. मुळात आदिशक्ती किंवा शक्ती म्हणजे काय? हे माहीत नाही आणि शक्तीचे स्वरुप जाणून घेण्यात कुणाला रसही नाही.

दुर्गा स्तोत्रामध्ये धर्मराज शक्तीचे वर्णन करताना म्हणतात, मेळवुनी पंचभूतांचा मेळl तुवा रचिला ब्रम्हांडगोळ l इच्छा परतता तात्काळ l क्षणांत निर्मूळ करिसी तू ll अर्थात जी पंचभूतांचा मेळ घालून ब्रम्हांडाची निर्मिती करू शकते आणि क्षणांत ते नष्ट करू शकते अशी विश्वाची उत्पत्ती आणि लय करू शकणारी विश्वाची मालकीण आहे. तिच्या तेजाचे वर्णन करताना धर्मराज म्हणतात, अनंत बाल सूर्यश्रेणी l तव प्रभेमाजी गेल्या विरोनी ll

श्री देवीसुक्तमध्ये, अतिसौम्यातिरौद्रायै असे देवीच्या स्वरूपाचे वर्णन केले आहे. अर्थातच आदिशक्ती ही भक्तवत्सल आहे. विश्वव्यापक आहे. चराचर जीव सकल व्यापक जगत् जननी आहे.

मूळात शक्ती ही एकच आहे परंतु प्रसंगानुरूप तिने वेगवेगळी रुपे घेतली आहेत. जशी वीज ही एकच आहे पण पंखा, विद्युत रोषणाई, ध्वनीयंत्र अशा अनेक स्वरुपात तिचा वापर केला जातो. तशी शक्ती ही एकच आहे. रोजच्या जीवनातील उदाहरण सांगायचे म्हणजे एखादी स्त्री तिच्या मुलांसाठी प्रेमळ आई होते. पतीसाठी त्याची पत्नी होते. प्रपंच सांभाळताना ती उत्तम गृहिणी होते. तेच मुलावर किंवा घरावर काही संकट आल्यास ती रणचंडिका होते. म्हणजे स्त्री एकच पण वेगवेगळ्या भूमिका निभावत असते. त्याचप्रमाणे शक्ती ही एकच आहे. प्रसन्नमुद्रेमध्ये ती भक्तवत्सल महालक्ष्मी होते. विद्यादायिनी सरस्वती होते. दुर्जन, दैत्य मर्दनासाठी ती दुर्गा, चामुंडा, महाकाली अशा उग्र रणचंडिका स्वरुपात प्रगट होते.

सात्विक साधक लक्ष्मी, सरस्वती अशा स्वरूपातील देवीची आराधना करतो. कोणी सामर्थ्य प्राप्तीसाठी दुर्गा, महाकाली स्वरूपातील देवीची सेवा, उपासना करतो तर तांत्रिक साधक दशमहाविद्येतील उग्र शक्तींची उपासना करतो. साधक ज्या स्वरुपात शक्तीला आवाहन करतो त्याप्रमाणे शक्ती प्रगट होते. महाकालीचे उग्र रूपदेखील साधकाला प्रेमळच वाटते. कारण ती संहारक रौद्रमुद्रा ही दुर्जन, दैत्य असुर यांच्यासाठी भयदायक आहे. साधकाला त्याचे कसले भय? तो तर तिचा बालक आहे. प्रत्यक्ष काळावरसुद्धा मात केली आहे अशा महाकालीचा वरदहस्त मस्तकी लाभल्यावर साधकाला भय ते काय उरले?

महिला दिनाच्या टिमक्या वाजवणाऱ्या लोकांनी हे लक्षात घेतले पाहिजे, की जागतिक महिला दिन अवघ्या काही दशकांपूर्वी सुरू झाला आहे. पण भारतामध्ये सहस्र वर्षांपूर्वीपासून एक दिवस नव्हे तर तब्बल नऊ दिवस महिला दिन साजरा होतो आहे. आपल्या तोकड्या वैचारिक कुवतीमुळे हे आपल्याला अजूनही समजले नाही ही खेदाची बाब आहे. काही धर्मामध्ये आजही महिलांना प्रार्थनास्थळामध्ये प्रवेश नाही. याउलट नवरात्रीत कुमारिका पूजन करणे ही आपल्या संस्कृतीची वैचारिक प्रगल्भता आहे.

हा सर्व लेखनाचा खटाटोप एवढ्यासाठीच की, तोंडाला लाली-पावडर लावून शोभेची बाहुली बनून फक्त नाचण्यासाठी हा सण नसून शक्तीची आराधना करून स्वतःमध्ये प्रचंड सामर्थ्य निर्माण करण्यासाठी शक्तीचा केलेला हा जागर आहे. देवीने नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या कधीच परिधान केल्या नव्हत्या तर देवी हाती शस्त्र घेऊन दानव कुळाचा नाश करत होती. चंड-मुंड, शुंभ -निशुंभ, महिषासुर या दैत्यांचा निःपात करत होती. देवीचे हे स्वरुप समजून घेऊन, तिची आराधना करून स्वतः मध्ये प्रचंड सामर्थ्य निर्माण करणे हा नवरात्रोत्सवाचा उद्देश आहे.

You Might Also Like

आषाढी एकादशी – इतिहास आणि महत्त्व
एड्स विरुद्धची समाजक्रांती : आजारापेक्षा कलंक घातक
पाण्याचा दिवस की आपल्या अस्तित्वाचा प्रश्न?
मला भावलेले डॉ मनमोहन सिंग… | BulletsIn
विद्यार्थी : नवयुगाच्या परिवर्तनाचे वाहक

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article मराठा आरक्षणासाठी नांदेडच्या शुभम पवारने केली आत्महत्या
Next Article राज्य कुस्ती स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या संघाची निवड
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?