पुणे 17 ऑक्टोबर (हिं.स) साधारणपणे जिवंत व्यक्तीच्या किडनी किंवा अन्य अवयवांचे प्रत्यारोपण केले जाते. पण, एका मृतदेहाच्या किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण ”सिम्बायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्रात करण्यात आले आहे.शव देणगीद्वारे ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचा दावा हॉस्पिटलने केला आहे.याबाबत रुग्णालयाचे डॉ. राजीव येरवडेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली.
एक 17 वर्षाची तरुणी, जिला अनुवंशिक मूत्रपिंडाचा आजार होता. गेल्या दोन वर्षांपासून तिला “हिमो डायलिसिस’ करावे लागत होते. यामुळे तिला अनेक “साइड इफेक्ट’चा सामना करावा लागला. परंतु किडनी प्रत्यारोपणाने तिची ही समस्या दूर होण्याची शक्यता बरीच होती. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी किडनीसाठी नोंदणी केली. घरात वडील-आई यांच्या किडनी अनुपयुक्त होत्या, त्यामुळे त्या नाकारण्यात आल्या. अशा परिस्थितीत आता फक्त “शव देणगी’चाच (“मृतदाता’) पर्याय होता. त्यामुळे त्यांनी तशी नोंदणी केली. मृतदात्याकडून तिला किडनी मिळाली.
हिंदुस्थान समाचार
