पुणे 8 ऑक्टोबर : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने (पीडीसीसी) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा खरीप हंगामातील पिकांसाठी २ हजार ११० कोटी ७ लाख ५४ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले.ही रक्कम गेल्या वर्षाच्या वाटपाच्या तुलनेत यंदा २६६ कोटी १८ लाख ४३ हजार रुपयांनी जास्त आहे. यंदा पीककर्ज वाटपाचे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या तुलनेत ११.६४ टक्क्यांनी जास्त आहे.
पुणे जिल्ह्यातील दोन लाख ३१ हजार ७४९ शेतकऱ्यांना या पीककर्ज योजनेचा लाभ झाला.जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांसाठी दरवर्षी एक एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्हा बँक पीककर्ज वाटप करत. या नुसार पीककर्ज वाटपाची मुदत ३० सप्टेंबरला संपली. यंदा वाटपाचे एकूण प्रमाण हे १११.६४ टक्के इतके झाले. गतवर्षी हेच प्रमाण १०२.३४ टक्के इतके होते. पीककर्जवाटपासाठी यंदा एक हजार ८९० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी दिली.
