मुंबई, 7 ऑक्टोबर (हिं.स.) – गोदरेज प्रॉपर्टिज लिमिटेड (GPL) (BSE scrip id: GODREJPROP), ही भारतातील आघाडीची बांधकाम विकासक कंपनी असून, कंपनीने नागपूरमध्ये जवळपास १०९ एकर जमीन अधिग्रहित केल्याची घोषणा आज केली. या जमिनीवर निवासी घरांसाठी नियोजित बांधकाम असेल आणि त्यात अंदाजे २२ लाख स्केअर फूट एवढी जागा विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
ही जमनी समृद्धी महामार्गाजवळ (मुंबई आणि नागपूर यांना जोडणारा एक्स्प्रेस वे) आणि मिहान सेझ प्रकल्पाजवळ आहे. त्यामुळे मुंबई-कोलकाता अशा दोन्ही हायवेशी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एअरपोर्ट, नागपूरशी ही कनेक्ट असलेली जमीन आहे.
या भागात चांगला विकास झालेला आहे आणि महापालिकेच्या पायाभूत सुविधाही येथे आहेत. येथे शाळा, हॉस्पिटल्स, किरकोळ दुकाने आणि मनोरंजनाची साधनेही आहेत.
गोदरेज प्रॉपर्टिजचे एमडी आणि सीईओ गौरव पांडे म्हणाले की, हा नवीन प्रकल्प आमच्या नागपूरमधील पोर्टफोलिओमध्ये येत असल्याचा आम्हाला आनंद आहे. त्यामुळे नागपूरमधील आमचा विस्तार आणखी होणार आहे. शिवाय भारतातील छोट्या पण महत्त्वाच्या मार्केटमध्ये आपले अस्तित्व आणखी मजबूत करण्याच्या करण्याच्या आमच्या धोरणाचाच हा एक भाग आहे. आम्ही नागपूर येथे सर्वोत्तम नियोजित प्रकल्प विकास करू इच्छितो. त्यामुळे येथे राहणाऱ्यांना दीर्घकाळासाठी त्याचे मूल्य चांगले राहील.
हिंदुस्थान समाचार
