cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Sports > टिम नील्सन आता ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघाचे नेतृत्व करणार
Sports

टिम नील्सन आता ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघाचे नेतृत्व करणार

CliQ INDIA
Last updated: August 9, 2025 6:38 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

मेलबर्न, 8 ऑगस्ट (हिं.स.)। माजी ऑस्ट्रेलियन मुख्य प्रशिक्षक टिम नील्सन यांची ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघाच्या नव्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते भारत अंडर-19 संघाविरुद्ध होणाऱ्या घरच्या मालिकेतून आपल्या नव्या भूमिकेची सुरुवात करतील. येणाऱ्या अंडर-19 विश्वचषकाच्या तयारीसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

भारताविरुद्ध मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघ जाहीर –

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या मालिकेसाठी 15 सदस्यीय ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघाची घोषणा केली आहे. ही मालिका सप्टेंबरमध्ये ब्रिस्बेन आणि मॅके येथे खेळली जाईल. यात तीन 50 षटकांचे सामने आणि दोन चार-दिवसीय युवा कसोटी सामने असतील.

• वनडे सामने : 21, 24 आणि 26 सप्टेंबर – ब्रिस्बेनच्या इयान हीली ओव्हल मैदानावर

• पहिली युवा कसोटी : 30 सप्टेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये

• दुसरी युवा कसोटी : 7 ऑक्टोबरपासून मॅके येथे

ऑलराउंडर ऑलिव्हर पीक संघाबाहेर –

संघात ऑलिव्हर पीक यांचा समावेश केलेला नाही, कारण त्याच काळात ते ऑस्ट्रेलिया ए संघासोबत भारत दौऱ्यावर असतील. पीक यांनी गेल्या वर्षी भारतात झालेल्या युवा कसोटीत शतक ठोकले होते आणि अलीकडेच ऑस्ट्रेलिया ए कडून श्रीलंका ए विरुद्ध 92 धावांची खेळी करत निवडकर्त्यांचे लक्ष वेधले होते. ते पुढील वर्षी होणाऱ्या अंडर-19 विश्वचषकासाठी पात्र असले तरी त्यांच्या व्यस्त घरगुती हंगामामुळे आणि मेलबर्न रेनेगेड्सकडून मिळालेल्या बीबीएल करारामुळे त्यांचा संघातील सहभाग अनिश्चित आहे.

टिम नील्सनचे पुन्हा प्रशिक्षकपदावर पुनरागमन –

57 वर्षीय टिम नील्सन यांनी 2007 ते 2011 दरम्यान ऑस्ट्रेलिया वरिष्ठ संघाचे प्रशिक्षकपद भूषवले होते. त्याआधी ते जॉन बुकॅनन यांचे सहाय्यक प्रशिक्षक होते. त्यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्येही प्रशिक्षण दिले आहे. 2024 मध्ये ते पाकिस्तान टेस्ट संघाचे हाय परफॉर्मन्स प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत होते. आता ते पुन्हा एकदा क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या डेव्हलपमेंट भूमिकेत परतले असून लॉकलन स्टीव्हन्स यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या हेड ऑफ नॅशनल डेव्हलपमेंट सोन्या थॉम्पसन म्हणाल्या, या बहुप्रारूप मालिकेतून खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आणि त्यांच्या कौशल्यांना नवी कसोटी मिळेल, यासाठी आम्ही उत्सुक आहोत. अंडर-19 विश्वचषकाच्या आमच्या तयारीत ही मालिका महत्त्वाचा टप्पा आहे.

त्या पुढे म्हणाल्या, टिम नील्सन यांच्या अनुभवाचा आमच्या युवा संघाला मोठा फायदा होईल आणि त्यांचे नेतृत्व पुढील पिढीतील खेळाडूंना दिशा देईल.

ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघ (भारताविरुद्ध मालिकेसाठी):

सायमन बज, अ‍ॅलेक्स टर्नर, स्टीव्ह होगन, विल मलाझचुक, यश देशमुख, टॉम होगन, आर्यन शर्मा, जॉन जेम्स, हेडन शिलर, चार्ल्स लॅकमुंड, बेन गॉर्डन, विल बायरम, केसी बार्टन, अ‍ॅलेक्स ली यंग, जेडन ड्रेपर.

रिजर्व खेळाडू: जेड होलिक, टॉम पॅडिंग्टन, जूलियन ऑस्बॉर्न.

—————

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर

You Might Also Like

नगर : विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मैदानी खेळांचे महत्व खूप अधिक – डॉ.चौहान
नेहरू सेंटरमध्ये ”दुर्गासप्तशती” उदयराज गडनीस यांच्या चित्रांचे प्रदर्शन
GT वि RCB आयपीएल 2026 लाइव स्ट्रीमिंग: गुजरात टायटंस विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु सामना केव्हा आणि कुठे पाहावा
टी-२० विश्वचषकात रोमारियो शेफर्डच्या हॅटट्रिकमुळे वेस्ट इंडिजची विजयी सलामी
शनिवारपासून ''नजीब मुल्ला ट्रॉफी २०२४'' क्रिकेट स्पर्धेला सुरुवात

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article इंडी आघाडीच्या बैठकीत ठाकरे शेवटच्या रांगेत, भाजपसह शिंदे गटाची टीका
Next Article पारंपरिक अंदाजात मोनालिसा आणि अश्विनी बागल यांचं रक्षाबंधन साजरं
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?