अहमदनगर, 19 ऑक्टोबर :- विद्यार्थीदशेत शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळ आनंद निर्माण करतो.तर जीवनात विजय मिळवून संयमाने व पराभव झाल्यास खचून न जाता पुढे जाण्याचे गुण विकसीत करतात. विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मैदानी खेळाची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन राहुरी कृषी विद्यापिठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी महावीरसिंग चौहान यांनी केले.
क्रीडा युवक सेवा संचानलाय पुणे,जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर व ॲथलेटीक्स असोशिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी चौहान बोलत होते.
यावेळी छत्रपती पुरस्कार विजेते सुनिल जाधव,क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन कर ताना व्यायाम व आहाराचे महत्त्व सांगितले.वाडिया पार्क क्रीडा संकुलमध्ये पार पडले मैदानी स्पर्धा मध्ये एक हजार पेक्षा जास्त शालेय मुला-मुलींनी सहभाग घेतला होता.१४, १७ व १९ वयोगटातील मुला-मुलींच्या धावणे,लांब उडी ,उंच उडी,थाळी फेक,गोळा फेक,रिले,तिहेरी उडी,बांबु उडी, भालाफेक,हॅमर थ्रो,क्रॉस कंट्री आदी स्पर्धा पार पडल्या.
