चंद्रपूर 31 डिसेंबर (हिं.स.):-बल्लारपूर तालुका क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात अव्वल स्थान प्राप्त केलेले जेसन जेम्स कॅस्टिलीनोसह महाराष्ट्रातील विविध खेळाडूंनी अव्वल स्थान प्राप्त केले.
१०० मीटर तसेच २०० मीटर धावणे जेसन जेम्स कॅस्टिलीनो (महाराष्ट्र), ११० मीटर अडथळ्याची शर्यत संदीप विनोदकुमार (महाराष्ट्र), ४०० मीटर अडथळ्याची शर्यत अली समिर शेख (महाराष्ट्र), ६ कि.मी. क्रॉस कंट्री दशरथ तुकाराम (महाराष्ट्र), ११० मीटर अडथळ्याची शर्यत अलिझा आफताब मौला (महाराष्ट्र), थाळी फेक भक्ती तानाजी गावडे (महाराष्ट्र), ४ कि.मी. क्रॉस कंट्री साक्षी भास्कर भंडारी (महाराष्ट्र)
हिंदुस्थान समाचार
