पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक (पीसीपी) मधील विद्यार्थ्यांनी इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडन्ट स्पोर्ट्स असोसिएशन, डी.१ झोनतर्फे आयोजित वेटलिफ्टिंग व कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावले. राजगड पॉलिटेक्निक, भोर येथे झालेल्या या स्पर्धेत १३ पॉलिटेक्निक महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता.
BulletsIn
- गौरांग राम विंचूरणे (७७ किलो), श्रेयश सचिन काकडे (१०५ किलो) यांनी वेटलिफ्टिंगमध्ये प्रथम क्रमांक मिळवला.
- शिवम कैलास बिरादार (५६ किलो) व अमन विश्वंभर कांबळे (९४ किलो) यांनी वेटलिफ्टिंगमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला.
- सोहम साळुंखे (५७ किलो) व विकी सांगळे (९७ किलो) यांनी वेटलिफ्टिंगमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
- कुस्ती स्पर्धेत विकी सांगळे (९७ किलो) आणि सोहम साळुंखे (५७ किलो) यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
- पंच सुधीर म्हाळसकर, पंच साठे, पंच गणेश यांच्या उपस्थितीत विजेत्यांना गौरवण्यात आले.
- प्राचार्य डी. के. खोपडे, समन्वयक प्रा. एस. के. नाणवरे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.
- संघ व्यवस्थापक प्रा. गणेश राजे, प्रा. चेतन चिमोटे, अतुल मराठे, डी. बी. सोरटे, राहुल पवार, ठाकरे सर यांनी संघाचे उत्तम मार्गदर्शन केले.
- क्रीडा समन्वयक सुनिल जगताप, किशोर गव्हाणे, लक्ष्मी दरकुडे, प्राचार्या डॉ. विद्या बॅकोड यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
- पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
- उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले.
