नवी दिल्ली, 20 ऑगस्ट (हिं.स.)
पाकिस्तानचा माजी क्रिेकेटपटू वसीम अक्रमने इम्रान खानबद्दल मोठे विधान केले आहे. ‘स्विंगचा सुलतान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसीमने इम्रान खानला जगातील सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून वर्णन केले आहे, जो त्याच्या मते कपिल देवपेक्षाही चांगला होता. अक्रम इम्रान खानला एक गुणवान क्रिेकेपटू नाही तर एक मेहनती क्रिकेटपटू असल्याचे म्हटले आहे.
अक्रम म्हणाला, मला वाटते की मी क्रिकेटपटू म्हणून मैदानावर आणि मैदानाबाहेर जे काही केले त्याचे श्रेय त्याला जाते. त्याने आम्हाला खूप आत्मविश्वास दिला. त्याने आघाडीवरून नेतृत्व केले. त्याला त्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता. तो एक मेहनती क्रिकेटपटू होता. अनेक जण इम्रानला नैसर्गिकरित्या गुणवान क्रिकेटपटू मानत असताना, अक्रमने त्याचे यश अथक प्रयत्नांचे परिणाम असल्याचे आवर्जून सांगितले आहे.
अक्रमने पुढे सांगितले, लोक म्हणायचे की, तो नैसर्गिकरित्या खूप प्रतिभावान होता. पण माझ्या दृष्टीने इम्रान प्रतिभावान नव्हता.. तो कठोर परिश्रम करत होता. त्याने आपली गोलंदाजी ऍक्शन बदलली.एखाद्या गोलंदाजाला थोडीशी ऍक्शन बदलण्यासाठी महिने लागू शकतात. कदाचित ते घडणार नाही. पण त्याने त्याची ऍक्शन बदलली. तो खूप दृढनिश्चयी होता.
अक्रमने भर दिला की, इम्रानचा दृढनिश्चय आणि स्वतःला नवीन बनवण्याची तयारी संपूर्ण संघासाठी एक उदाहरण आहे. अक्रमच्या मते, ‘त्याच्या कठोर परिश्रमाने असे वातावरण निर्माण केले की कोणीही आत्मसंतुष्ट होऊ शकत नाही. अक्रमने त्याला आपल्या काळातील सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून संबोधले आहे’.
—————
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
