लासलगाव, २६ नोव्हेंबर, (हिं.स) लासलगाव येथील जय जनार्दन अनाथ व वृध्दाश्रम तसेच विसा स्केटिंग अकॅडमीची विद्यार्थिनी दुर्गा गुंजाळ हिने भारतीय संघात सहभाग घेऊन याक पब्लिक स्कूल खोपोली मुंबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत यश संपादन करत सुवर्ण पदक पटकावून लासलगाव चे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरले.
भारत,श्रीलंका,मालदीव,यू ए इ आणि केनिया या पाच देशांच्या सहभागसह आंतरराष्ट्रीय एडूरन्स चॅलेंज २०२३ स्पर्धेत लासलगाव येथील अनाथ आश्रम मध्ये राहणारी दुर्गा दिलीप गुंजाळ हिने भारताचे प्रतिनिधित्व करत सुवर्ण पदक पटकावले आहे.
स्केटिंग प्रशिक्षक श्याम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेल्या या आंतरराष्ट्रीय स्केटीग स्पर्धेसाठी निफाड तालुक्यातून भारतीय संघात तीन विद्यार्थ्यांची निवड झाली होती.दुर्गा दिलीप गुंजाळ,विराज शाम चौधरी,पियुष अजय धनवट या तिन्ही खेळाडूंनी भारतासाठी चार पदक जिंकल्याने निफाड तालुक्याचे तसेच लासलगाव चे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरले गेले आहे.या विजयी खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
हिंदुस्थान समाचार
