भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने २३ जून २००७ रोजी आयर्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १८ वर्षे पूर्ण झाल्याचा टप्पा गाठल्याबद्दल क्रिकेटविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आपल्या या प्रवासाबद्दल रोहितने सोशल मीडियावर भावूक पोस्ट करत मनोगत व्यक्त केलं आहे. या १८ वर्षांच्या प्रवासात रोहितने भारतीय क्रिकेटला अनेक ऐतिहासिक क्षण दिले आहेत.
BulletsIn
-
रोहित शर्माने २३ जून २००७ रोजी आयर्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
-
त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८ यशस्वी वर्षे पूर्ण केली आहेत.
-
रोहितने टी-२० विश्वचषक आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी भारताला जिंकून दिली आहे.
-
२०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात भारत अंतिम फेरीत पोहोचला, मात्र ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला.
-
त्यामुळे रोहितचं एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं.
-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने तीनही फॉरमॅटमध्ये मिळून १९,००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
-
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक म्हणजे ३ द्विशतक झळकावण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे.
-
रोहित शर्माला टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार मानलं जातं.
-
त्याने कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून सध्या केवळ एकदिवसीय क्रिकेटमध्ये सक्रिय आहे.
-
त्याचं लक्ष्य २०२७ च्या विश्वचषकात भारताला विजेतेपद मिळवून देण्याचं आहे.
