नाशिक, 22 ऑक्टोबर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेतील अनुष्का लहानु धात्रक हिने ४०० मी. फ्रीस्टाईल स्पर्धेत सुवर्ण पदक तसेच ५० मी.बटरफ्लाय स्पर्धेत रजक पदक प्राप्त केले. १९ वर्षांखालील शालेय मैदानी स्पर्धा प्रकारातील २०० मीटर धावणे स्पर्धेत गुलशन तिवारी या विद्यार्थ्यांने २४ सेकंदात अंतर पार करून दुतीय क्रमांक मिळवला. तसेच याच गुलशन तिवारी याने महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने आयोजित केलेल्या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केल्याने राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे,१५ कि.मि सायकलिंग स्पर्धेत सार्थक सचिन काकड,कार्तिक दिनकर गिते यांनी प्रथम क्रमांक मिळवला या सर्व विद्यार्थ्यांची विभागीय पातळीसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल खेळाडूंचे व मार्गदर्शक क्रीडासंचालक प्रा.दिनकर गिते यांचे संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथभाऊ थोरे,उपाध्यक्ष ऍड पी.आर.गिते,सरचिटणीस हेमंतअप्पा धात्रक,सहचिटणीस ॲड. तानाजी आप्पा जायभावे,सर्व विश्वस्त व संचालक,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय सानप,उपप्राचार्य डॉ.पोर्णिमा बोडके,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य कैलास गिते,शिक्षकेतर कर्मचारी महेंद्र गिते,स्वप्नील भाबड,रावसाहेब आव्हाड यांच्यासह सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
