सातारा, 1 डिसेंबर (हिं.स.) – सातारा जिमखान्याचा सुप्रसिद्ध बास्केटबॉलपटू तनय थत्ते याची राज्य बास्केटबॉल संघात निवड झालेली आहे. गेले अनेक वर्षे सातारा शहरातील सातारा जिमखान्याच्या वतीने राज्य तसेच विविध स्तरावरील स्पर्धेत आपल्या खेळाच्या कसबिने व चमकदार खेळाडू म्हणून तनय पुढे आलेला आहे. तनय हा सातारच्या सुप्रसिद्ध बास्केटबॉलपटू व प्रशिक्षक आणि मार्गदर्शक प्राची थत्ते यांचा चिरंजीव आहे.
37 व्या खुल्या राष्ट्रीय स्पर्धा या 3 ते 10 डिसेंबर रोजी लुधियाना येथे होणार आहेत. महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल सातारा जिमखानाचे रमेश शानभाग, संकेत शानभाग, हेमंत जाजू, अभय चव्हाण, दीपक पाटील, निशांत गवळी यांनी अभिनंदन केले व पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हिंदुस्थान समाचार
