ठाणे, 13 डिसेंबर (हिं.स.) श्री मावळी मंडळ या संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य करत गौरवशाली यशानंतर विविध खेळांच्या स्नर्धा भरवून आपले सक्रिय योगदान दिले आहे. व्यायामशाळा, कबड्डी व आता ॲथेलेटीक्स स्पर्धेचे यशस्वी आयोजन करुन कौतुकास्पद कार्य केले आहे, असे मत शिवसेना उपनेते दशरथ पाटील यांनी व्यक्त केले. श्री मावळी मंडळाच्य वतीने २० वी आंतरशालेय चॅम्पियनशिप २०२३ -२४ स्पर्धेचे उद्घाटन दशरथदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
श्री मावळी मंडळ ठाणे संस्थेने २० वी श्री मावळी मंडळ आंतर शालेय अथेलेटिक्स स्पर्धां २०२३-२४ ९ व १० डिसेंबर रोजी संस्थेच्या क्रीडांगणात आयॊजीत केल्या हॊत्या. श्री मावळी मंडळाच्य वतीने २० वी आंतरशालेय चॅम्पियनशिप २०२३ – २४ स्पर्धेत ६ वर्षांपासून ते १६ वर्षापर्यंतच्या मुलामुलींनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेमध्ये ठाण्यातील ३२ शाळेच्या १२०० स्पर्धकांनी भाग घेतला हॊता. ह्या स्पर्धेत ठाणे पोलीस स्कूल या शाळेने मुले व मुलींच्या गटात सांघिक विजेतेपद मिळवीत सांघिक ओव्हरऑल चॅम्पियनशिपचे पारितोषिक पटकाविले. या स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ १० डिसेंबर रोजी प्रमुख पाहुणे कांचन पवार ( विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण, ठाणे) यांच्या हस्ते झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोरे, उपाध्यक्ष मिलिंद यादव, खजिनदार दिनेश मोरे, चिटणीस रमण गोरे, सह चिटणीस संतोष सुर्वे, उप चिटणीस चिंतामणी पाटील, विश्वस्त कृष्णा डोंगरे, विश्वस्त प्रभाकर सुर्वे, विश्वस्त पॅट्रिक फर्नांडीस, विश्वस्त रवींद्र आंग्रे, विश्वस्त केशव मुकणे व संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे : मुले जनरल चॅम्पियनशिप – ठाणे पोलीस स्कूल (७१ गुण – ८ सुवर्ण ८ रौप्य ७ कांस्य), मुली जनरल चॅम्पियनशिप – ठाणे पोलीस स्कूल (८१ गुण – १० सुवर्ण ९ रौप्य ४ कांस्य) सांघिक विजेता जनरल चॅम्पियनशिप – ठाणे पोलीस स्कूल (१६७ गुण – २० सुवर्ण १८ रौप्य १३ कांस्य), सांघिक उपविजेता जनरल चॅम्पियनशिप – वसंत विहार हायस्कूल (१०७ गुण – १३ सुवर्ण १३ रौप्य ८ कांस्य) मुलांमध्ये सर्वोकृष्ट खेळाडू – आयुष पाटील (श्री मा विद्यालय पाटलीपाडा), मुलींमध्ये सर्वोकृष्ट खेळाडू – दीपिका सखदेव (सरस्वती मंदिर ट्रस्ट इंग्लिश मीडियम), ह्या स्पर्धेत खालील स्पर्धकांनी नवीन विक्रम केले. गट (खेळ प्रकार) – खेळाडूचे नाव (शाळेचे नाव) – वेळ/अंतर,मुले ८ वर्षाखालील (लांब उडी)- जिहांश पाटील (अंबर इंटरनॅशनल) – ३.३३ मी., मुले १४ वर्षाखालील (६० मी. धावणे)- आयुष पाटील (श्री मा विद्यालय पाटलीपाडा) – ७.४ से. ,मुले १४ वर्षाखालील (३०० मी. धावणे)- आयुष पाटील (श्री मा विद्यालय पाटलीपाडा) – ४३.२ से. मुले १४ वर्षाखालील (गोळा फेक)- अथर्व परब (श्री मावळी मंडळ हायस्कूल ) – ४३.२ से.,मुली १२ वर्षाखालील (१५० मी. धावणे) – दीपिका सखदेव (सरस्वती मंदिर ट्रस्ट इंग्लिश मीडियम) – २२ से., मुली १२ वर्षाखालील (लांब उडी) – ऱ्हेना रिजो (वसंत विहार हायस्कूल) – ४. मी., मुली १६ वर्षाखालील (६० मी. धावणे) – अदा पठाण (वसंत विहार हायस्कूल) – ७.९ से. वैयक्तिक चॅम्पियनशिप : मुले ६ वर्षाखालील – ज्ञानदीप खैरनार (ठाणे पोलीस शाळा), आदर्श जितेंद्र गजरे(श्री मावळी मंडळ हायस्कूल), विराज पवार (टीएमसी शाळा क्र.२३ प्राथमिक व शाळा क्र.१५ माध्यमिक किसन नगर), मुली ६ वर्षाखालील – तन्वी परब (लोक पुरम पब्लिक स्कूल), मुले ८ वर्षाखालील – जिहांश पाटील (अंबर इंटरनॅशनल), मुली ८ वर्षाखालील – पर्ल बिरवटकर (वसंत विहार हायस्कूल), मुले १० वर्षाखालील – आराध्या पाटील (वसंत विहार हायस्कूल) प्रतीक गाडेकर (ठाणे पोलीस शाळा), मुली १० वर्षाखालील – आर्या पगारे (ठाणे पोलीस शाळा), मुले १२ वर्षाखालील – स्वस्तिक मुसळे (ठाणे पोलीस शाळा), मुली १२ वर्षाखालील – दिपिका सखदेव (सरस्वती मंदिर ट्रस्ट इंग्लिश मीडियम), मुले १४ वर्षाखालील – आयुष पाटील (श्री मा विद्यालय पाटलीपाडा), मुली १४ वर्षाखालील –
रिद्धी माने (होलीक्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल), मुले १६ वर्षाखालील –
गिरिक बंगेरा (श्री मा बालनिकेतन हायस्कूल, कोपरी), मुली १६ वर्षाखालील – वैष्णवी गोपनार (ठाणे पोलीस शाळा)
हिंदुस्थान समाचार
