न्यूयॉर्क, 24 जून (हिं.स.) फिफा
क्लब वर्ल्ड कपमध्ये लिओनेल मेसीच्या इंटर मियामी संघाचा सामना त्याचा माजी क्लब
पॅरिस सेंट-जर्मेनशी होईल. कारण इंटर मियामीने पाल्मेरासशी २-२ अशी बरोबरी साधून
बाद फेरी गाठली आहे.
दोन्ही
संघांना स्पर्धेतील बाद फेरी गाठण्यासाठी एक गुण पुरेसा होता. आणि हार्ड रॉक
स्टेडियमवर ६०,९१४ चाहत्यांसमोर तादेओ अलेंडे आणि
लुईस सुआरेझ यांनी इंटर मियामीला २-० ने आघाडी मिळवून दिली होती. मात्र, ब्राझिलियन
क्लब पाल्मेरासने शेवटच्या १० मिनिटांत दोन गोल केले. पॉलिन्हो आणि मॉरिसियो
आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. आणि त्यामुळे पाल्मेरासचा संघ गोल फरकाच्या
जोरावर ‘अ’गटामध्ये
विजेतेपद अव्वल स्थानावर कायम राहिले.
लिओनेल
मेसी आणि त्याचा इंटर मियामी संघ २९ जून रोजी अटलांटा येथे अंतिम १६ मध्ये चॅम्पियन्स लीग विजेत्या पीएसजीशी सामना करतील.
—————
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra
