नवी दिल्ली, २३ फेब्रुवारी (हिं.स.)भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सुपर ८ सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने शानदार कामगिरी करून ही कामगिरी केली.
या सामन्यापूर्वी बुमराहला माजी भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या ३२ विकेट्सच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी तीन विकेटेसची आवश्यकता होती. त्याने चार षटकांत फक्त १५ धावा देत तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या आणि अश्विनला मागे टाकले.
बुमराहने दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज क्विंटन डी कॉक, रायन रिकेल्टन आणि कॉर्बिन बॉश यांना बाद करून संघाला एक मजबूत सुरुवात दिली. या कामगिरीसह, बुमराहच्या टी-२० विश्वचषकात एकूण विकेट्स संख्या ३३ वर पोहोचली आहे. बुमराहने या सामन्यात चमकदार कागमिरी केली असली तरी, या सामन्यात भारताला ७६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
टी-२० विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक विकेट्स:
१. जसप्रीत बुमराह – ३३ विकेट्स (२२ डाव)
२. अर्शदीप सिंग – ३२ विकेट्स (१८ डाव)
३. रविचंद्रन अश्विन – ३२ विकेट्स (२४ डाव)
४. हार्दिक पंड्या – २९ विकेट्स (२६ डाव)
५. रवींद्र जडेजा – २२ विकेट्स (२९ डाव)——————-
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
