देशाच्या विविध प्रांतातील दिग्गज खेळाडू ”भजेपार चषक” मध्ये सहभागी
गोंदिया ३० डिसेंबर (हिं. स.) : गोंदिया जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात महिला, पुरुष कबड्डीसाठी प्रसिद्ध असलेल्या भजेपार चषक ला आजपासून सुरवात झालेली आहे. भजेपार येथील सूर्योदय क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. दूर दुरून कबड्डीचे सामने बघायला येणाऱ्या प्रेक्षकांना आरामात बसून बघता यावे यासाठी सुसज्ज गॅलरीची खास व्यवस्था करण्यात आली असून काही भाग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
हिंदुस्थान समाचार
