अहमदनगर, 28 ऑक्टोबर(हिं.स.):- पुणे जिल्ह्यातील फुलगाव येथे ४ ते ९ नोव्हेंबर येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी नगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या निवड चाचणीत नगर जिल्ह्यातील विविध वजन गटातील २०० मल्लांनी सहभाग नोंदवला होता.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्यावतीने नगर शहरातील टी.व्ही सेंटर जवळील गंगा उद्यान मागील खेळाच्या मैदाना वर नियोजनबद्ध पद्धतीने माती व गादी विभागात निवड चाचणी स्पर्धेचा शुभारंभ आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे,उपाध्यक्ष अर्जुन शेळके,सचिव संतोष भुजबळ,शिवाजीराव चव्हाण,प्रविण घुले,पै शिवाजी कराळे,बबनराव काशिद,बापुसाहेब थेटे,युवराज करंजुले,पांडुरंग गुंजाळ,गुलाब बर्डे,तुकाराम पवार आदी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार
